लीड्स - क्रिकेटच्या मैदानावर चेंडू लागून खेळाडूंचा जीव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तशीच घटना आज ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यात घडता घडता वाचली. दैव बलवत्तर म्हणून आफ्रिकेचा फलंदाज थोडक्यात बचावल्याचे पाहायला मिळाले.
-
Matrix moves from Markram to avoid friendly fire!
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 6, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
😎 #CWC19 | #AUSvSA pic.twitter.com/9Gf8rSS5mq
">Matrix moves from Markram to avoid friendly fire!
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 6, 2019
😎 #CWC19 | #AUSvSA pic.twitter.com/9Gf8rSS5mqMatrix moves from Markram to avoid friendly fire!
— Cricket World Cup (@cricketworldcup) July 6, 2019
😎 #CWC19 | #AUSvSA pic.twitter.com/9Gf8rSS5mq
आज ऑस्ट्रेलिया विरुध्द दक्षिण आफ्रिका या संघात साखळी सामन्यातील शेवटचा सामना होत आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर आफ्रिकेचे सलामीवीर क्विंटन डी'कॉक आणि अॅडन मार्करम हे मैदानात उतरले. फलंदाजी दरम्यान डी'कॉकने एक जोरदार फटका लगवला. तो नॉन स्ट्रायकर असलेल्या मार्करमच्या अंगावर आला. मार्करमने प्रसंगवधान दाखवत चेंडूच्या दिशेपासून दुसऱ्या बाजूला सरकला. त्यामुळे तो थोडक्यात बचावला.