लंडन - भारताचा अष्टपैलू आणि स्टार खेळाडू हार्दिक पांड्याला लंडनमध्ये नुकत्याच एका शस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. या शस्त्रक्रियेनंतर पांड्याने एक फोटो शेअर करत चाहत्यांचे आभार मानले होते. यावेळी आपल्या सोशल मीडियावरून पांड्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये तो व्हिलचेअरवर बसला असून त्याला चालण्यासाठी मित्राचा आधार घ्यावा लागत आहे.
हेही वाचा - '६०० चं माहित नाही पण ५०० विकेट्स अश्विन नक्की घेईल', भज्जीचं मत
पांड्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांनी त्याच्या उत्तम प्रकृतीविषयी प्रार्थना केली आहे. हार्दिकला मागील अनेक दिवसांपासून पाठीच्या दुखापतीचा त्रास होत होता. या दुखापतीवरील उपचारासाठी त्याने लंडनला जाण्याचा निर्णय घेतला होता.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
आगामी बांगलादेश विरुध्दच्या टी-२० मालिकेसह पुढील काही महिन्यांपर्यंत हार्दिक क्रिकेट खेळू शकणार नाही. त्याला मागील वर्षी दुबईत झालेल्या एशिया कप स्पर्धेत पाठीची दुखापत झाली होती. त्यानंतर त्याने यंदाच्या विश्वकरंडक स्पर्धेत पुनरागमन केले होते.आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेदरम्यान पाठीला दुखापत होणारा हार्दिक भारताचा दुसरा खेळाडू आहे. यापूर्वी जसप्रीत बुमराहच्या पाठीला दुखापत झाली होती. यामुळे बुमराहने आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली.
लंडनमधील यशस्वी शस्त्रक्रियेनंतर, हार्दिकने 'मी लवकरत पुनरागमन करेन' असा संदेश दिला होता. त्यामुळे चाहत्यांनातो कधी पुनरागमन करतो, याकडे लक्ष लागले आहे.
-
Surgery done successfully 🥳
— hardik pandya (@hardikpandya7) October 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Extremely grateful to everyone for your wishes ❣️ Will be back in no time! Till then miss me 😉 pic.twitter.com/XrsB8bWQ35
">Surgery done successfully 🥳
— hardik pandya (@hardikpandya7) October 5, 2019
Extremely grateful to everyone for your wishes ❣️ Will be back in no time! Till then miss me 😉 pic.twitter.com/XrsB8bWQ35Surgery done successfully 🥳
— hardik pandya (@hardikpandya7) October 5, 2019
Extremely grateful to everyone for your wishes ❣️ Will be back in no time! Till then miss me 😉 pic.twitter.com/XrsB8bWQ35