हैदराबाद - भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने सर्बियन मॉडेल नताशा स्टॅन्कोविक हिच्याशी प्रेमाची कबुली दिली. या दोघांनी साखरपूडा केला असून लवकरच ते लग्न करणार, असल्याचे समजते. हार्दिकने साखपूड्यांची माहिती आपल्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिली.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हार्दिक पांडयाने आज (बुधवार) नताशासोबतचा एक फोटो आपल्या अधिकृत्त इंन्स्टाग्राम अकाऊंटव शेअर केला. त्याला त्याने, 'मे तेरा तू मेरी जाने सारा हिंदुस्तान...असे मजेशीर कॅप्शनही त्याने शेअर केलेल्या फोटोला दिले आहे. हार्दिक आणि नताशा समुद्रात क्रुझवर मित्रांसोबत मस्ती करताना दिसत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, हार्दिकच्या पोस्टनंतर सोशल मीडियावरुन त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारतीय संघाचा कुलदीप यादवने हार्दिकला शुभेच्छा दिल्या आहेत. याआधी हार्दिकने नताशासोबतचा फोटो शेअर करुन प्रेमाची कबुली दिली होती.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हार्दिक सध्या दुखापतीमुळे भारतीय क्रिकेटपासून लांब आहे. त्याने दुखापतीतून सावरुन क्रिकेटच्या सरावाला सुरूवात केली आहे. आगामी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्व करंडकासाठी हार्दिक भारतीय संघात परतेल, असा विश्वास क्रिकेट चाहत्यांना आहे.
हेही वाचा - 'विराटसारखा परफेक्ट कर्णधार, मी जीवनात नाही पाहिला'
हेही वाचा - नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात टीम इंडिया खेळणार १० आंतरराष्ट्रीय सामने