ETV Bharat / sports

व्हिडिओ: हार्दिक पंड्या आणि करण जोहरने अंबानीच्या लग्नात लावले ठुमके - कॉफी विथ करण

काही महिन्यांपूर्वी हार्दिक पंड्याने करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुलला बीसीसीआयच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.

हार्दिक-करण १११
author img

By

Published : Mar 10, 2019, 3:34 PM IST

मुंबई - मुकेश अंबानीचा मुलगा आकाश अंबानीच्या लग्नासाठी अनेक सेलिब्रिटी, राजकारणी आणि खेळाडूंनी हजेरी लावली. मुंबई इंडियन्स ही फ्रँचायझी अंबानींच्या मालकीच्या आहे. हार्दिक पंड्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याने आकाश अंबानीच्या लग्नाला हजेरी लावली होती.

अंबानीच्या लग्नाला हार्दिक पंड्यासोबत करण जोहरनेही हजेरी लावली होती. दोघांनी यावेळी एकमेकांची गळाभेट घेत ठुमके मारले. दोघांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

काही महिन्यांपूर्वी हार्दिक पंड्याने करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुलला बीसीसीआयच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. दोघांना ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यात सोडून चौकशीसाठी मायदेशी परतावे लागले होते. यानंतर करणची कॉफी हार्दिक-राहुलला कडू लागली, अशा मजेदार प्रतिक्रियाही सोशल मीडियात उमटल्या होत्या.

Intro:Body:

Hardik Pandya and Karan Johar dance in Aakash Ambani wedding ceremony

Hardik pandya, karan johar, dance, aakash, ambani, wedding, ceremony, आकाश अंबानी, करण जोहर, हार्दिक पंड्या, लग्न, कॉफी विथ करण, मुंबई इंडियन्स

व्हिडिओ: हार्दिक पंड्या आणि करण जोहरने अंबानीच्या लग्नात लावले ठुमके

मुंबई - मुकेश अंबानीचा मुलगा आकाश अंबानीच्या लग्नासाठी अनेक सेलिब्रिटी, राजकारणी आणि खेळाडूंनी हजेरी लावली. मुंबई इंडियन्स ही फ्रँचायझी अंबानींच्या मालकीच्या आहे. हार्दिक पंड्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळतो. भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या सध्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्याने आकाश अंबानीच्या लग्नाला हजेरी लावली होती.

अंबानीच्या लग्नाला हार्दिक पंड्यासोबत करण जोहरनेही हजेरी लावली होती. दोघांनी यावेळी एकमेकांची गळाभेट घेत ठुमके मारले. दोघांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे.

काही महिन्यांपूर्वी हार्दिक पंड्याने करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांमुळे हार्दिक पंड्या आणि के. एल. राहुलला बीसीसीआयच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. दोघांना ऑस्ट्रेलिया दौरा अर्ध्यात सोडून चौकशीसाठी मायदेशी परतावे लागले होते. यानंतर करणची कॉफी हार्दिक-राहुलला कडू लागली, अशा मजेदार प्रतिक्रियाही सोशल मीडियात उमटल्या होत्या.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.