ETV Bharat / sports

HBD Rohit : रोहितने गुडघ्यावर बसून रिंग देत रितिकाला केलं प्रपोज, वाचा हिटमॅनची बॉलिवूड स्टाईल लवस्टोरी - रोहित शर्माची बायको

रोहित क्रिकेट विश्वात स्फोटक फलंदाजी तसेच हटक्या स्टाईलमुळे म्हणून ओळखला जातो. त्याची पर्सनल लाईफही हटकेच आहे. कारण रोहित अन् रितिका यांच्या लग्नाची गोष्ट एका बॉलीवूड चित्रपटाच्या कथेप्रमाणेच आहे.

happy birthday rohit sharma : Rohit Sharma And Ritika Sajdeh's Love Story
HBD Rohit : रोहितने गुडघ्यावर बसून रिंग देत रितिकाला केलं प्रपोज, वाचा हिटमॅनची बॉलिवूड स्टाईल लवस्टोरी
author img

By

Published : Apr 30, 2020, 11:19 AM IST

मुंबई - टीम इंडियाचा 'हिटमॅन' खेळाडू रोहित शर्माचा आज वाढदिवस. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याचे चाहते, सहकारी खेळाडूंकडून त्याच्यावर शुभेच्छाचा वर्षाव होत आहे. रोहित क्रिकेट विश्वात स्फोटक फलंदाजी तसेच हटक्या स्टाईलमुळे म्हणून ओळखला जातो. त्याची पर्सनल लाईफही हटकेच आहे. कारण रोहित अन् रितिका यांच्या लग्नाची गोष्ट एका बॉलीवूड चित्रपटाच्या कथेप्रमाणेच आहे.

रितिका ही भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंहची मानलेली बहिण. रितिका रोहितची मॅनेजर म्हणून काम पाहत असे. रोहित व रितिका कामाच्या निमित्ताने एकमेकांशी भेटायचे. असेच जवळपास सहा वर्षांपर्यत चाललं. रितिका ही स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजर होती आणि ती रोहितच्या सर्व मिटींग याची नोंद ठेवायची. नंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले.

happy birthday rohit sharma : Rohit Sharma And Ritika Sajdeh's Love Story
रोहित रितिका

रोहितने मुंबईच्या बोरीवली स्पोर्ट्स ‌अ‌ॅकडमीमध्ये गुडघ्यावर बसून हातात रिंग घेत रितिकाला लग्नाची मागणी घातली. रितिकानंही त्याला होकार दिला. महत्वाचे म्हणजे रोहितने याच अ‌ॅकडमीतून क्रिकेट कारकिर्दीला सुरूवात केली.

रोहित-रितिका या जोडीने ३ जून २०१५ मध्ये साखरपूडा केला. त्यानंतर ते १३ डिसेंबर २०१५ मध्ये विवाहबद्ध झाले. हा विवाह सोहळा मुंबईच्या ताज लँड हॉटेलमध्ये पार पडला. या लग्नाला क्रिकेटपटू बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योगपती उपस्थित होते. महत्वाची बाब म्हणजे, लग्नानंतर मुंबई इंडियन्सचे मालक अंबानी यांनी रोहित-रितिका जोडीला विवाहाची ग्रँड पार्टी दिली होती. त्यात देशातील मोठमोठी व्यक्ती हजर होत्या. त्यावेळी रोहित मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार होता.

रोहित रितिका विवाह प्रसंगी

रोहित-रितिका दाम्पत्याला १३ डिसेंबर २०१८ ला एक मुलगी झाली. त्यांनी तिचे नाव समायरा ठेवले. मुलीच्या जन्माच्या वेळी रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. त्याने हा दौरा अर्ध्यातून सोडून, भारतात रितिकाला भेटण्याठी परतला.

रोहित रितिका मुलगी समायरा सोबत...

हेही वाचा - HBD Rohit : मुंबई इंडियन्सने आपल्या लाडक्या कर्णधाराला दिल्या हटक्या शुभेच्छा

हेही वाचा - Happy Birthday Rohit Sharma : एकेकाळी शाळेची फी भरण्यासाठी नव्हते पैसे, आज आहे टीम इंडियाचा 'हिटमॅन'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.