ETV Bharat / sports

धोनीच्या षटकारांना काहीच अर्थ नव्हता, गंभीरची टीका

author img

By

Published : Sep 23, 2020, 7:02 PM IST

आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरूद्ध झालेल्या सामन्यात धोनीने सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली. हा सामना राजस्थानने १६ धावांनी जिंकला. या क्रमांकावरून गंभीरने धोनीवर टीका केली आहे.

Gautam gambhir slammed ms dhoni's decisionn to bat at number seven
धोनीच्या षटकारांना काहीच अर्थ नव्हता, गंभीरची टीका

शारजाह - आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने वरच्या फळीत फलंदाजी करायला हवी होती, असे मत भारताचे माजी सलामीवीर गौतम गंभीरने दिले आहे. मंगळवारी झालेल्या सामन्यात राजस्थानने चेन्नईचा १६ धावांनी पराभव केला. या सामन्यात धोनीने सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली.

प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने २० षटकांत सात गडी गमावून २१६ धावा केल्या. तर, प्रत्युत्तरात चेन्नई २० षटकांत २०० धावा करू शकला. गंभीर म्हणाला, "खरे सांगायचे झाल्यास मी आश्चर्यचकित झालो. धोनी सातव्या क्रमांकावर? ऋतुराज गायकवाड आणि सॅम करनला पुढे पाठवले गेले. मला हे समजले नाही. तुम्हाला पुढाकाराने संघाचे नेतृत्व केले पाहिजे. २१७ धावांचा पाठलाग करताना धोनी सातव्या क्रमांकावर? मला वाटते फक्त डु प्लेसिस एकटा ही लढाई लढत होता.''

गंभीर म्हणाला, ''हो, शेवटच्या षटकात धोनीने फटकावलेल्या तीन षटकारांविषयी आपण बोलू शकतो, पण खरे सांगायचे तर त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्या फक्त त्याच्या धावा होत्या. जर कोणी दुसरा खेळाडू अथवा कर्णधार सातव्या क्रमांकावर फलंदाजीला गेला असता तर त्याच्यावर टीका झाली असती.''

"तो धोनी आहे. कदाचित म्हणूनच लोक त्याच्याबद्दल बोलत नाहीत. जेव्हा आपल्याकडे सुरेश रैना नसेल तेव्हा आपणास सॅम करनला अधिक चांगले म्हणतो. मुरली विजय, ऋतुराज गायकवाड, करन, केदार जाधव, फाफ डु प्लेसिस, तुमच्यापेक्षा चांगले आहेत, असे तुम्हाला सांगायचे आहे", असेही गंभीर म्हणाला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.