लाहोर - पाकिस्तानचा माजी फिरकीपटू सकलेन मुश्ताकने भारताचा 'चायनामन' गोलंदाजाचे कौतुक केले आहे. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये सध्याच्या काळात कुलदीपने चमकदार कामगिरी बजावली असल्याचे मुश्ताकने सांगितले.
मुश्ताकने एका मुलाखतीदरम्यान सांगितले, "मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये कुलदीपने उत्तम कामगिरी केली आहे. मला तो खूप आवडतो. मी त्याच्याशी खूप वेळा बोललो आहे आणि तो एक सुशिक्षित क्रिकेटपटू असल्याचे दिसते."
''ऑस्ट्रेलियाचा नॅथन लायन हा कसोटी क्रिकेटमधील एक उत्कृष्ट फिरकीपटू आहे. ऑस्ट्रेलियाचा लायन अप्रतिम कामगिरी करत आहे. त्याने इंग्लंड, पाकिस्तान आणि भारतविरुद्ध चांगली कामगिरी केली. पण घरच्या मैदानावर खेळताना रविचंद्रन अश्विनपेक्षा उत्तम जगात दुसरा फिरकीपटू दुसरा कोणी नाही. रवींद्र जडेजाही कसोटी क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करतो आहे,'' असे मुश्ताक म्हणाला.
कुलदीपने आतापर्यंत भारतासाठी 6 कसोटी, 60 एकदिवसीय सामने आणि 21 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे 24, 104 आणि 39 बळी घेतले आहेत.