दुबई - आगामी आयसीसी महिला विश्वकरंडक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. बांगलादेश आणि थायलंड या दोन देशांच्या समावेशामुळे ही स्पर्धा अधिक रंजक ठरणार आहे.
स्कॉटलंड येथे आयोजित केलेल्या पात्रता इवेंटमध्ये बांगलादेशच्या महिला संघाने विजय मिळवला. या विजयासोबत बांगलादेशच्या संघाला 'अ' गटात स्थान मिळाले आहे. गतविजेता ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, श्रीलंका हे संघ 'अ' गटात समाविष्ट आहेत.
हेही वाचा - सचिन नव्हे, विराट नव्हे, तर एका महिलेने केलाय हा 'भीमपराक्रम'
तर दुसरीकडे, थायलंडच्या संघाने विश्वकरंडक स्पर्धेत दमदार पुनरागमन केले आहे. १२ वर्षांपूर्वी या संघाने आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. थायलंड संघाला 'ब' गटात स्थान मिळाले आहे. या गटात इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान हे संघ आहेत.
-
Here's how the groups for the #T20WorldCup shape up 👇 pic.twitter.com/O2V9UqTSHd
— T20 World Cup (@T20WorldCup) September 7, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Here's how the groups for the #T20WorldCup shape up 👇 pic.twitter.com/O2V9UqTSHd
— T20 World Cup (@T20WorldCup) September 7, 2019Here's how the groups for the #T20WorldCup shape up 👇 pic.twitter.com/O2V9UqTSHd
— T20 World Cup (@T20WorldCup) September 7, 2019
पात्रता इवेंट स्पर्धेत थायलंडचा संघ अंतिम फेरीत पोहचण्यात यशस्वी ठरला, मात्र, अंतिम सामन्यात बागंलादेशने त्यांना ७० धावांनी पराभूत केले. २२ फेब्रुवारीला हा संघ वेस्ट इंडीजशी पहिला सामना खेळेल. तर, बांगलादेशचा सलामीचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे.
स्पर्धेत भारताचा पहिला सामना २१ फेब्रुवारीला यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. तर या स्पर्धेचा अंतिम सामना ८ मार्चला खेळवण्यात येईल. याच दिवशी आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा केला जातो. महिलांच्या या विश्वकरंडक स्पर्धेनंतर पुरुषांची विश्वकरंडक स्पर्धा पार पडणार आहे. ही स्पर्धा १८ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबरपर्यत असणार आहे.