नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण 'क्रीडा-कॅलेंडर' ठप्प झाले आहे. जगभरातील अनेक खेळाडू आपल्या मित्रांसह आणि चाहत्यांशी संवाद साधून हा मोकळा वेळ सोशल मीडियाच्या माध्यमातून वापरत आहेत. पण, आता चाहत्यांनादेखील टिकटॉकवरील ‘क्रिकटॉक इव्हेंट’ मध्ये त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंबरोबर बोलण्याची संधी मिळणार आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर, भारतीय लेगस्पिनर युजवेंद्र चहल, सुरेश रैना आणि अन्य क्रिकेटपटू बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासून या कार्यक्रमात चाहत्यांशी गप्पा मारतील.
लॉकडाऊन दरम्यान लोकांना घरात राहण्यासाठी प्रेरित करणे, हे या कार्यक्रमाचे उद्दीष्ट आहे. यासाठी त्यांचा 'घर बैठा इंडिया' हा उपक्रम आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्ससह सत्राची मालिका आहे. या कार्यक्रमात केव्हिन पीटरसन त्यांच्या जादूच्या युक्त्या आणि व्हिडिओंबद्दल बोलणार आहे. तर वॉर्नर आपल्या मुलीला बॉक्सिंगचा धडा देणारी एक कथा सांगेल.
दुसरीकडे, रैना आपला चेन्नई सुपर किंग्जचा साथीदार महेंद्रसिंह धोनीबरोबर खेळताना आणि घरी असताना मुलांबरोबर कसा वेळ घालवत आहे, याचा अनुभव सांगणार आहे.