ETV Bharat / sports

सुसाट फार्मात असलेल्या शमीला संघाबाहेर बसवणे कोहलीला महागात पडू शकते - MOHMMAD SHAMI

श्रीलंकेविरुध्दचा सामना भारतासाठी महत्त्वपूर्ण होता असे म्हणता येणार नाही. कारण भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचलेलाच होता. गुणातालिकेत अव्वल क्रमांक पटकावण्यासाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे होते इतकेच. मात्र, या सामन्यात आश्चर्याचा धक्का होता तो म्हणजे, भारतीय संघ या सामन्यात दोन बदलांसह उतरला. या सामन्यात कर्णधार कोहली युजवेंद्र चहलच्या ठिकाणी कुलदीप यादव आणि मोहम्मद शमीच्या ठिकाणी रविंद्र जडेजाला सोबत घेऊन मैदानात उतरला. कोहलीचे हे धाडसच म्हणावे लागेल.

लंकेविरुध्दच्या सामन्यात विराट चुकला...भारताच्या 'विश्वकरंडक' जिंकण्याच्या स्वप्नाला 'खतरा'
author img

By

Published : Jul 7, 2019, 8:05 PM IST

Updated : Jul 8, 2019, 3:56 PM IST

लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भारताने श्रीलंकेचा एकतर्फी पराभव केला. हा विजय अपेक्षितच होता. कारण स्पर्धेत श्रीलंकेचे प्रदर्शन म्हणावे तसे उल्लेखनीय ठरलेले नव्हते. श्रीलंकेने इंग्लडचा संघ सोडून इतर दुबळ्या संघाबरोबर सामने जिंकले होते. त्यात अफगाणिस्तान, वेस्ट इंडिजचा समावेश होतो. श्रीलंकेने या संपूर्ण स्पर्धेत 300 हून अधिक धावा फक्त एकाच सामन्यात केल्या आहेत. मात्र, तसे पाहायला गेल्यास लंकेचा संघ अनलकी ठरला आहे, कारण त्यांचे दोन सामने पावसामुळे रद्द झाले आहेत.

दरम्यान, श्रीलंकेविरुध्दचा सामना भारतासाठी महत्त्वपूर्ण होता असे म्हणता येणार नाही. कारण भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचलेलाच होता. गुणातालिकेत अव्वल क्रमांक पटकावण्यासाठी हा सामना जिंकणे महत्त्वाचे होते इतकेच. मात्र, या सामन्यात आश्चर्याचा धक्का होता तो म्हणजे, भारतीय संघ या सामन्यात दोन बदलासह उतरला. या सामन्यात कर्णधार कोहली युजवेंद्र चहलच्या ठिकाणी कुलदीप यादव आणि मोहम्मद शमीच्या ठिकाणी रविंद्र जडेजाला सोबत घेऊन मैदानात उतरला. कारण भारतीय संघ विजयी रुळावर असताना, कर्णधार कोहली आणि संघ व्यवस्थापकांनी अचानक लंकेविरुध्दच्या सामन्यात दोन बदल केले.

विरेंद्र सेहवागने उठवले कोहलीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह -
भारतीय संघाचा माजी विस्फोटक सलामीचा फलंदाज विरेंद्र सेहवागने समालोचन करताना कोहलीच्या संघ बदलाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. तो म्हणतो, मला वाटत फार्मात असलेल्या मोहम्मद शमीला लंकेविरुध्दच्या सामन्यात अंतिम 11 मध्ये जागा द्यायला हवी होती. तो विकेट घेणारा गोलंदाज आहे. भुवनेश्वर कुमार जखमी झाल्यानंतर संघात येऊन शमीने कमी सामन्यात 14 गडी बाद केले. असं त्यानं सांगितलं.

विरेंद्र सेहवाग सोडून अनेक दिग्गज खेळाडूंनी विराटच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. फार्मात असलेल्या शमीची 'लय' विराटने तोडली असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. कोणताही खेळाडू पूर्ण फार्मात असताना मैदानाबाहेर बसायला तयार नसतो. मात्र, कोहलीच्या निर्णयाने शमीला बाकावर बसावे लागले. मात्र, शमीला संघाबाहेर बसवणे कोहलीला महागात पडू शकते.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 8, 2019, 3:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.