वेलिंग्टन - मॅडी विलियर्सच्या धारधार गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंड महिला क्रिकेट संघाने तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात यजमान न्यूझीलंड महिला संघाचा ३२ धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने न्यूझीलंडचा मालिकेत ३-० ने धुव्वा उडवला.
न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. तेव्हा इंग्लंडने २० षटकात ९ बाद १२८ धावा केल्या. फ्रान्स विलसन हिने नाबाद ३१ धावांची खेळी केली. तर सोफिया डंकले (२६), टॅमी ब्यूमोंटने १४ धावा जमवल्या. न्यूझीलंडकडून कर्णधार सोफी डिवाइनने तीन विकेट घेतल्या. तर केसपर्क, रोजमॅरी, अमेलिया आणि ब्रूक हालीडे यांनी प्रत्येकी एक-एक गडी बाद केला.
इंग्लंडने दिलेले आव्हान यजमान संघाला पेलावले नाही. त्यांचा संपूर्ण संघ ९६ धावांवर ऑलआउट झाला. मॅडीने सर्वाधिक ३ बळी घेतले. दरम्यान, इंग्लंडने पहिला टी-२० सामना ७ तर दुसरा ६ गडी राखून जिंकला होता.
हेही वाचा - IND W vs SA W १st ODI : दक्षिण अफ्रिकेचा भारतावर ८ गडी राखून विजय
हेही वाचा - ब्रेकिंग न्यूज! आयपीएलच्या चौदाव्या हंगामाचे वेळापत्रक आले समोर