ऑकलंड - उत्कंठा, रोमांच, थरार आणि टाय.. असंच काहीसे वर्णन इंग्लंड विरुध्द न्यूझीलंड सामन्याचे करावे लागेल. दोन्ही उभय संघात ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळवण्यात आली. या मालिकेतील अखेरचा सामना अविश्वमरणीय ठरला. विश्वकरंडक २०१९ चा अंतिम सामन्यात न्यूझीलंडला सुपर ओव्हरमध्ये हरवून इंग्लंडने पहिल्यांदाच विश्वविजेतेपद पटकावले. तसाच विजय इंग्लंडने पुन्हा एकदा साकारत टी-२० मालिका जिंकली.
न्यूझीलंड आणि इंग्लंड संघातील पाचव्या निर्णयाक टी-२० सामन्याला पावसामुळे उशीरा सुरुवात झाली. यामुळे पंचानी हा सामना ११-११ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेतला.
इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. तेव्हा न्यूझीलंडने मार्टिन गुप्टील (२० चेंडूत ५०), कॉलिन मुनरो (२१ चेंडूत ४६) तसेच टीम सिफर्ट (१६ चेंडूत ३९) यांच्या खेळीने ११ षटकात ५ बाद १४६ धावा केल्या. तेव्हा इंग्लंडनेही जॉनी बेअरस्टोच्या दणकेबाज खेळीने ११ षटकात समान १४६ धावा केल्या.
-
Here we go again... 🤜🤛pic.twitter.com/F4D0ArXft1
— Cricket World Cup (@cricketworldcup) November 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Here we go again... 🤜🤛pic.twitter.com/F4D0ArXft1
— Cricket World Cup (@cricketworldcup) November 10, 2019Here we go again... 🤜🤛pic.twitter.com/F4D0ArXft1
— Cricket World Cup (@cricketworldcup) November 10, 2019
दोन्ही संघानी समान धावा केल्याने, सामन्यात नियमाप्रमाणे 'सुपर ओव्हर' खेळवण्यात आली. यामध्ये इंग्लंडने बाजी मारली आणि मालिका ३-२ ने जिंकली.
सुपर ओव्हरचा थरार -
सुपर ओव्हरमध्ये इंग्लंड संघाकडून फलंदाजीसाठी इयॉन मॉर्गन आणि जॉनी बेअरस्टो आले होते. तर गोलंदाज होता टीम साऊथी. मॉर्गन आणि बेअरस्टो या दोघांनी ६ चेंडूत २ षटकारांच्या मदतीने १७ धावा केल्या.
इंग्लंडच्या १७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघ ८ धावाच करु शकला. न्यूझीलंडकडून मार्टिन गुप्टील, सिफर्ट आणि कॉलिन डे ग्रँडहोम यांनी फलंदाजी केली. मात्र, त्यांना इंग्लंडचा गोलंदाज ख्रिस जॉर्डनने विजयापासून रोखले.
- सुपर ओव्हरमध्ये इंग्लंडने काढलेल्या धावा - १,६,१,६,१,२ एकूण -१७
- सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने काढलेल्या धावा - २, वाईड, ४, ०, विकेट (सेईफेर्ट), १, ० एकूण - ८
संक्षिप्त धावफलक -
न्यूझीलंड
११ षटकात १४६/५
इंग्लंड
११ षटकात १४६/७