लंडन - कोरोना विषाणूच्या संकटात क्रिकेटला ब्रेक लागला होता. यातून आता हळूहळू दोन संघामधील मालिकांना सुरूवात करण्यात येत आहे. या दरम्यान, भारतीय संघाचे २०२१ या सालातील वेळापत्रक समोर आले. यातील भारताच्या इंग्लंड दौऱ्याचे शेड्युल इंग्लंड बोर्डाने जाहीर केले आहे.
भारतीय संघ सद्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावरून जानेवारीमध्ये मायदेशात परतल्यानंतर भारतीय संघ दोन महिने इंग्लंड संघाचा पाहुणचार करणार आहे. इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार असून त्यात ४ कसोटी, ४ एकदिवसीय व ४ टी-२० सामने होतील. यानंतर भारतीय संघ ऑगस्ट महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्याच्या वेळापत्रकाची इंग्लंड क्रिकेट बोर्डाने अधिकृत घोषणा केली आहे.
टीम इंडियाचा इंग्लंड दौरा
- ४ ते ८ ऑगस्ट - पहिली कसोटी, ट्रेंट ब्रिज
- १२ ते १६ ऑगस्ट - दुसरी कसोटी, लॉर्ड्स
- २५ ते २९ ऑगस्ट - तिसरी कसोटी, इमेराल्ड हेडिंग्ले
- २ ते ६ सप्टेंबर - चौथी कसोटी, किया ओव्हल
- १० ते १४ सप्टेंबर- पाचवी कसोटी, ओल्ड ट्रॅफर्ड
हेही वाचा - धोनीच्या नेतृत्वात खेळलेल्या जलद गोलंदाजानं घेतली क्रिकेटमधून निवृत्ती
हेही वाचा - IND vs AUS: क्रिकेट मालिकेआधीच ऑस्ट्रेलियाला जबर झटका; वेगवान गोलंदाजाने घेतली माघार