लंडन - इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने एका वृत्तपत्राविरुद्ध खटला दाखल केला. खासगी आयुष्यातील एक प्रकरण 'द सन' नावाच्या वृत्तपत्राने प्रकाशित केल्यामुळे स्टोक्सने हा खटला दाखल केला आहे.
हेही वाचा - 'जंबो' सांभाळणार किंग्स इलेव्हन पंजाब संघाची धुरा
स्टोक्सच्या जन्माच्या तीन महिन्यांअगोदरचे हे प्रकरण असून स्टोक्सच्या आईच्या मित्राने त्याच्या चुलत भावाची आणि बहिणीची हत्या केली होती, असे वृत्त 'द सन'ने प्रकाशित केले होते. त्यामुळे खासगी आयुष्यातील स्वातंत्र्यावर बोट ठेवल्याने स्टोक्सने हा खटला दाखल केला आहे. या वृत्तानुसार, ही घटना न्यूझीलंडमध्ये घडली होती.
या खटल्याविरूद्ध 'द सन'ने आपली प्रतिक्रिया दिली. स्टोक्सच्या कुटुंबातील सदस्याने हे वृत्त दिल्याचे म्हटले आहे. 'स्टोक्स आणि त्याच्या आईबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. मात्र, या वृत्तामध्ये त्याच्याच कुटुंबातील एका सदस्याने मदत केली होती. या वृत्तासोबत त्याने फोटोही दिले होते. त्यावेळी ही घटना न्यूझीलंडमध्ये व्यापक स्वरूपात दाखवण्यात आली होती', असे 'द सन'ने म्हटले आहे.