कराची - भारतीय संघ जर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरला, तर यावर्षी जून महिन्यात होणारा आशिया करंडक स्थगित होईल, अशी प्रतिक्रिया पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष एहसान मनी यांनी दिली. कराचीमध्ये माध्यमाशी बोलताना मना म्हणाले, दोन्ही स्पर्धेच्या तारखा एक येत आहेत. यामुळे मला वाटत की, आशिया करंडक २०२३ सालापर्यंत पुढे ढकलावा लागेल.
पीसीबीचे सीईओ वसीन खान यांच्या मते, '१८ जूनला लंडनच्या ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर होणारा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना भारतीय संघ खेळणार हे जवळपास निश्चित आहे. याचदरम्यान, आशिया करंडकाचे आयोजन देखील जूनमध्ये होणार आहे. ही स्पर्धा श्रीलंकेत होणार आहे. मागील वर्षी ही स्पर्धा कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आली होती.
दरम्यान, भारतीय संघ अद्याप जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरलेला नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेच्या निकालावर फायनलिस्ट ठरणार आहे. उभय संघातील अखेरचा सामना भारताने अनिर्णीत किंवा जिंकला तर भारतीय संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. जर इंग्लंडने हा सामना जिंकला तर ऑस्ट्रेलियाचा संघ न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना खेळेल.
हेही वाचा - NZ vs ENG, ३rd ODI : न्यूझीलंडचा इंग्लंडवर ७ गडी राखून विजय
हेही वाचा - ICC Test Rankings: रोहित शर्मा 'टॉप-१०' मध्ये दाखल