ETV Bharat / sports

RR VS MI : मुंबईसाठी रोहितची दुखापत चिंतेचा विषय; आजच्या सामन्यात खेळण्याबाबतही साशंकता

चेन्नईविरुद्धच्या मागील सामन्यात रोहित शर्मा अंतिम संघात नव्हता. स्नायू दुखावले गेल्याने, त्याला बाहेर बसावे लागले होते. पण हा सामना मुंबईने एकतर्फा १० गडी राखून जिंकला. आज राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबईचा सामना होणार आहे. या सामन्यात देखील रोहित शर्माच्या खेळण्याबाबत सशांकता आहे.

doubt-remains-about-playing-rohit-sharma-against-rajasthan-royals
RR VS MI : मुंबईसाठी रोहितची दुखापत चिंतेचा विषय; आजच्या सामन्यात खेळण्याबाबतही संशाकता
author img

By

Published : Oct 25, 2020, 4:21 PM IST

Updated : Oct 25, 2020, 4:38 PM IST

दुबई - मुंबई इंडियन्ससाठी रोहित शर्मा एक महत्वपूर्ण खेळाडू आहे. तो फलंदाजीशिवाय संघाचे नेतृत्व सक्षमपणे सांभाळतो. पण चेन्नईविरुद्धच्या मागील सामन्यात तो अंतिम संघात नव्हता. स्नायू दुखावले गेल्याने, त्याला बाहेर बसावे लागले होते. पण हा सामना मुंबईने एकतर्फा १० गडी राखून जिंकला. आज राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबईचा सामना होणार आहे. या सामन्यात देखील रोहित शर्माच्या खेळण्याबाबत साशंकता आहे.

चेन्नईविरुद्धच्या सामन्यादरम्यान, नाणेफेकसाठी केरॉन पोलार्ड आला. यामुळे रोहित शर्माची दुखापत गंभीर असल्याचे समोर आले. पण तो यातून किती सावरला आहे. याचे अपडेट अद्याप मिळू शकले नाहीत. अशात मुंबई इंडियन्सकडून देखील याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली आहे. पण रोहित शर्माची दुखापत संघासाठी चिंतेचा विषय ठरली आहे.

दरम्यान, मुंबईने आतापर्यंत ७ सामन्यात विजय मिळवत प्ले ऑफची जागा जवळपास निश्चित केली आहे. कारण मुंबईचा रनरेट इतर संघाच्या तुलनेत चांगला आहे. आज राजस्थान विरुद्धचा सामना जिंकून ते १६ गुणांसह प्ले ऑफची दावेदारी भक्कम करण्यासाठी इच्छुक आहेत. मुंबईचे क्विंटन डी कॉक, सूर्यकुमार यादव, इशान किशन सद्या सुसाट फॉर्मात आहेत. याशिवाय त्यांना हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या आणि केरॉन पोलार्डची चांगली साथ मिळत आहे. गोलंदाजीत बुमराह, बोल्ट आणि पॅटिन्सन हे त्रिकूट भेदक मारा करत आहे.

हेही वाचा - KXIP vs SRH : आम्ही करून दाखवणार, वॉर्नरने व्यक्त केला विश्वास

हेही वाचा - IPL २०२० Points Table: पंजाबचा विजयी चौकार, गुणतालिकेत झाले 'हे' बदल

Last Updated : Oct 25, 2020, 4:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.