मुंबई - बीसीसीआयने आयपीएलच्या चौदाव्या हंगामासाठी मेगा ऑक्शनचे संकेत दिले आहे. अशात सनरायझर्स हैदराबादचा संघ केन विल्यमसनची सोथ सोडणार, अशा चर्चांना उधाण आले आहे. यावर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने मोजक्या शब्दांत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडियावर एका चाहत्याने कर्णधार डेव्हिड वॉर्नरला विचारले की, हैदराबाद विल्यमसनला सोडणार का? या प्रश्नाला उत्तर देताना, आम्ही विल्यमसनला गमावणार नाही, असे वॉर्नरने सांगितले.
-
Not good news for CSK fans. pic.twitter.com/TH5fHpI6wp
— Johns. (@CricCrazyJohns) November 14, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Not good news for CSK fans. pic.twitter.com/TH5fHpI6wp
— Johns. (@CricCrazyJohns) November 14, 2020Not good news for CSK fans. pic.twitter.com/TH5fHpI6wp
— Johns. (@CricCrazyJohns) November 14, 2020
हैदराबादने २०१८ साली झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये केन विल्यमसनवर ३ कोटींची बोली लावली होती. पुढील हंगामासाठी लिलावाकरता हैदराबादने विल्यमसनला सोडलं तरीही राईट टू मॅच कार्डाद्वारे ते परत त्याला संघात स्थान देऊ शकतील.
आयपीएलच्या तेराव्या हंगामात केन विल्यमसनने १२ सामन्यात ३१७ धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत विल्यमसनने हैदराबादच्या संघाचे प्रतिनिधित्वही केले आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे आयपीएलचा तेरावा हंगाम यूएईमध्ये पार पडला. यात रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर मात करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
हेही वाचा - #IPL तेरावा संपताच चौदाव्या हंगामाची तयारी सुरू; ८ नव्हे तर ९ संघ होणार सहभागी - सूत्र
हेही वाचा - दिग्गजाने निवडला IPLचा सर्वोत्तम संघ; रोहित, विराट आणि राहुलला स्थान नाही