मुंबई - इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी आयसीसी एकदिवसीय विश्वकरंडकासाठी आता काहीच दिवसांचा अवधी बाकी राहिलाय. याच पार्श्वभूमीवर अनेक माजी क्रिकेटपटूंनी आपली मते मांडण्यास सुरुवात केली आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर यांच्या मते सध्याचा भारतीय क्रिकेट संघ मजबूत असून त्यांच्याकडे विश्वचषक जिंकण्याची सुवर्ण संधी आहे.
वेंगसरकर म्हणाले की, 'विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय क्रिकेट संघाकडे २०१९ चा विश्वचषक जिंकण्याची सुवर्ण संधी असेल. या विश्वचषकत भारतीय संघ सेमीफायनलपर्यंत आरामात जाईल. मात्र फायनल विषयी मी कोणतीही भविष्यवाणी करु शकत नाही. टीम इंडियामध्ये सध्या प्रतिभावान खेळाडूंचा भरणा असून ते सर्व खेळाडू सध्या चांगली कामगिरी करत आहेत.'
इंग्लंड आणि वेल्समध्ये ३० मे पासून विश्वकरंडक स्पर्धेला सुरूवात होणार आहे. २०१९च्या विश्वचषकात भारतीय संघाचा पहिला सामना ५ जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.
विश्वकरंडक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, विजय शंकर, रवींद्र जडेजा.