नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा सलीमीवीर शिखर धवनने कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराला सोशल मीडियावर मजेदार पद्धतीने ट्रोल केले आहे. सध्या कोरोना व्हायरसमुळे प्रत्येकजण घरातच बंद आहे आणि अशा परिस्थितीत पुजाराने त्याचा एक जुना फोटो पोस्ट केला. या पोस्टमध्ये त्याने “लॉकडाऊनमध्ये मला ज्या गोष्टीची सर्वाधिक आठवण येते ते क्रिकेटचे मैदान आहे”, असे म्हटले आहे.
- View this post on Instagram
The thing I miss the most in this lockdown is being on the cricket field.
">
धवनने पुजाराच्या पोस्टला ट्रोल केले आहे. “खरंच, तुला क्रिकेटची एवढी आठवण येत आहे हे आम्हाला माहित नव्हतं”, असे धवनने म्हटले आहे. कोरोनामुळे क्रीडाविश्वातील अनेक स्पर्धा स्थगित झाल्या असून आयपीएलही पुढे ढकलण्यात आली आहे.
२९ मार्चला सुरू होणारी आयपीएल स्पर्धा १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली होती. मात्र, लॉकडाऊन वाढवल्यामुळे ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित झाली आहे.