नवी दिल्ली - ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सोशल मीडियावर खूप सक्रिय झाला आहे. लॉकडाऊन दरम्यान वॉर्नर चाहत्यांसाठी सतत व्हिडिओ-फोटो शेअर करत असतो. आता तो एका नव्या व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर धूमाकुळ घालत असून चाहतेही या पोस्टला मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत.
वॉर्नरने या नव्या व्हिडिओमध्ये पत्नी कँडिसचा स्विमसूट घातला आहे. तर, त्याच्या पत्नीने ऑस्ट्रेलियन टीमची जर्सी घातली आहे. टिकटॉवर अपलोड केलेल्या या व्हिडिओला चाहते खूप पसंती देत असून वॉर्नरने हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवरही शेअर केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
यापूर्वी, वॉर्नरने आपल्या मुलीसह ‘शीला की जवानी’ गाण्यावर ठेका धरला होता. त्यानंतर त्याचा ‘फॅमिली डान्स’चा व्हिडिओही हिट झाला होता.