मुंबई - आयपीएलमधील सामन्यात पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याचा विक्रम डेव्हिड वॉर्नरच्या नावे आहे. त्याने पावर प्लेच्या ६ षटकात ताबडतोड फलंदाजी करत तब्बल ६ अर्धशतकं ठोकली आहेत.
आयपीएलमधील सामन्यात पावर प्लेमध्ये सर्वाधिक अर्धशतकं ठोकण्याचा विक्रम वॉर्नरच्या नावे आहे. वॉर्नर नंतर या यादीत ख्रिस गेलचा नंबर लागतो. त्याने ३ अर्धशतक ठोकली आहेत. तर के एल राहुल आणि सुनील नरेन प्रत्येकी २-२ अर्धशतकांसह या यादीत संयुक्तीक तिसऱ्या स्थानी आहेत.
दरम्यान, यंदाच्या आयपीएल हंगामात देखील सनरायझर्स हैदराबाद वॉर्नरकडून अशाच कामगिरीची आपेक्षा करत आहे. ३४ वर्षीय वॉर्नरने आतापर्यंत १४२ आयपीएल सामने खेळली आहेत. यात त्याने १४१.५४ च्या स्ट्राईक रेटने ४२.७२ सरासरीने ५ हजार २५४ धावा केल्या आहेत. वॉर्नरच्या नावे चार शतक आणि ४८ अर्धशतकांचा समावेश आहे.
आयपीएलच्या चौदाव्या हंगामात हैदराबादचा सलामी सामना ११ एप्रिल रोजी कोलकाना नाईट रायडर्स सोबत होणार आहे.
हेही वाचा - IPL २०२१ : RCBच्या अडचणीत आणखी भर, पडीक्कलनंतर आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण
हेही वाचा - पहिल्या महिला क्रिकेट समालोचक चंद्रा नायडू कालवश