दुबई - चेन्नई सुपर किंग्जने रविवारी आपल्या पराभवाचा दुष्काळ संपवत पंजाबवर मोठा विजय मिळवला. चेन्नईने पंजाबविरुद्धचा सामना १० गडी राखून जिंकला. या सामन्यानंतर गुणतालिकेत नेमके कोणते बदल झाले, पाहा...
चेन्नई विरुद्ध पंजाब यासामन्याआधी चेन्नईचा संघ गुणातालिकेत तळाशी म्हणजे आठव्या क्रमाकांवर होता. चेन्नईला झालेल्या चार सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवता आला होता. पण पंजाविरुद्धच्या सामन्यात चेन्नईने विजय मिळवला आणि दोन गुणांची कमाई केली. या विजयानंतर चेन्नईचा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
दुसरीकडे चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ सातव्या स्थानावर होता. पंजाबने झालेल्या चार सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळवता आला होता, तर तीन पराभव त्यांच्या पदरी पडले होते. त्यामुळे ते सातव्या स्थानावर होते. पण चेन्नईकडून झालेल्या पराभवानंतर त्यांना गुणतालिकेतील अखेरचे स्थान मिळाले आहे. या पराभवानंतर पंजाबचा संघ आठव्या स्थानावर घसरला आहे.
सध्याच्या घडीला गुणतालिकेत मुंबईचा संघ पहिल्या स्थानावर विराजमान आहे. दुसऱ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स आणि तिसऱ्या स्थानावर आरसीबीचा संघ आहे. चौथ्या आणि पाचव्या स्थानावर अनुक्रमे केकेआर आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आहेत. मुंबईकडून पराभव पत्करल्यावर हैदराबादचा संघ सहाव्या स्थानावर घसरला आहे.
हेही वाचा - MI vs SRH : मुंबईची हैदराबादवर ३४ धावांनी मात, गुणतालिकेत अव्वलस्थानी झेप
हेही वाचा - RCB VS DC : कुशल श्रेयससमोर अनुभवी विराटचे आव्हान; आज चॅलेंजर्संशी कॅपिटल्स भिडणार