मुंबई - चेन्नई सुपर किंग्ज संघाचा महत्वाचा खेळाडू सुरेश रैनाने व्यक्तिगत कारण देत आयपीएलच्या १३ व्या हंगामातून माघार घेतली. महत्वाचे म्हणजे तो स्पर्धेसाठी दुबईमध्ये दाखल झाला होता. पण अचानक त्याने माघार घेत भारतात परण्याचा निर्णय घेतला. रैनाच्या या निर्णयावर अनेक चर्चा होत आहेत. अशात सीएसकेचे मालक एन. श्रीनिवासन यांनी रैनाबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे.
सुरेश रैनाच्या आयपीएल न खेळता भारतात परतण्याच्या निर्णयावर श्रीनिवासन म्हणाले, रैनाच्या डोक्यात यश गेले आहे. रैनाच्या आयपीएल सोडण्यावर अनेक चर्चा सुरू होत्या. त्यापैकी एक म्हणजे संघातील २ खेळाडूंसह १३ जणांना कोरोनाची लागण झाल्याने तो घाबरला होता. त्या कारणानेच त्याने संघ सोडण्याचा निर्णय घेतला. दुसरे कारण म्हणजे रैनाला हॉटेलमधील रूम खराब मिळाली होती.
आयपीएलच्या १३ व्या हंगामाला सुरुवात झालेली नाही. पण आम्हाला रैनाची कमी नक्कीच जाणवेल. तो परत यावा अशी इच्छा आहे. त्याला याची कल्पना नक्कीच असेल की तो ११ कोटी रुपये सोडून गेला आहे, असेही श्रीनिवासन यांनी सांगितलं.
मी धोनीशी चर्चा केली. त्याने मला विश्वास दिला आहे की कोरोना रुग्णांची संख्या वाढली तरी काळजी करण्याचे कारण नाही. त्याच्याशी मी झूम अॅपच्या माध्यमातून चर्चा केली. त्याला मी सुरक्षित राहण्यास सांगितले, असेही श्रीनिवासन यांनी सांगितलं.
दरम्यान, सीएसकेचा संघ २१ ऑगस्ट रोजी दुबईला पोहोचला. तेव्हा संघातील जलद गोलदाज दीपक चाहर आणि यष्टीरक्षक ऋतुराज गायकवाड सह अन्य १३ जणांना कोरोना झाला. यानंतर रैनाने व्यक्तिगत कारण देत स्पर्धेतून माघार घेतली.
हेही वाचा - ENG vs PAK : दुसऱ्या टी-२० सामन्यात इंग्लंडचा पाकवर ५ गडी राखून विजय
हेही वाचा - IPL २०२० : दुनिया हिला देंगे हम; मुंबई इंडियन्स नव्या अवतारात मैदानात उतरणार