लंडन - दारूच्या नशेत ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी इंग्लंड क्रिकेट काऊन्टी ग्लॉस्टरशायरचा फलंदाज जॉर्ज हेकिन्सला सरे येथे अटक करण्यात आली आहे. एका वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार 28 प्रथम श्रेणी सामने खेळणार्या हेकिन्सला 19 एप्रिल रोजी कोबहमच्या पॉटरसमॉथ रोडवरील अपघाताच्या प्रकरणात अटक करण्यात आली होती. आता त्याला जुलैमध्ये गिल्डफोर्ड दंडाधिकारी न्यायालयात हजर केले जाईल.
ग्लॉस्टरशायर क्रिकेटने ही माहिती दिली आहे. क्लबने असे म्हटले आहे, की सरे पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. आम्ही हेकिन्सच्या संपर्कात आहोत.
23 वर्षीय हेकिन्सने 2016 मध्ये डरहॅमविरुद्ध पदार्पण केले आहे. आतापर्यंत त्याने 961 प्रथम श्रेणी धावा केल्या आहेत. त्याने 15 लिस्ट ए सामने आणि 7 टी-20 सामने खेळले आहेत.