ETV Bharat / sports

क्रिकेटपटू अंबाती रायुडूच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन - ambati rayudu latest news

सीएसकेने सोशल मीडियावरून ही माहिती दिली. रायुडूचा सहकारी सुरेश रैनाने आपल्या शुभेच्छा कळवल्या आहेत. ''अंबाती रायुडू आणि विद्याला शुभेच्छा. हा आशीर्वाद आहे! या लहान मुलीसह प्रत्येक क्षण जगा. देव तुम्हाला प्रेम आणि आनंद देवो'', असे रैनाने ट्विटरवर म्हटले.

cricketer ambati rayudu and wife chennupalli vidya blessed with baby girl
क्रिकेटपटू अंबाती रायुडूच्या घरात नव्या पाहुण्याचे आगमन
author img

By

Published : Jul 13, 2020, 4:21 PM IST

हैदराबाद - भारतीय क्रिकेट संघाचा आणि चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) भरवशाचा फलंदाज अंबाती रायुडूला मुलगी झाली आहे. एका नव्या पाहुण्याचे आगमन झाल्याने रायुडू आणि त्याची पत्नी चेनुपल्ली विद्या यांच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे.

सीएसकेने सोशल मीडियावरून ही माहिती दिली. रायुडूचा सहकारी सुरेश रैनाने आपल्या शुभेच्छा कळवल्या आहेत. ''अंबाती रायुडू आणि विद्याला शुभेच्छा. हा आशीर्वाद आहे! या लहान मुलीसह प्रत्येक क्षण जगा. देव तुम्हाला प्रेम आणि आनंद देवो'', असे रैनाने ट्विटरवर म्हटले.

रायुडूने भारताकडून 55 एकदिवसीय आणि 6 टी-20 सामने खेळले आहेत. मुलीच्या जन्माच्या खास प्रसंगी चाहत्यांनी त्याचे अभिनंदन केले आहे. याशिवाय, आई आणि मुलीच्या सुरक्षेसाठीही शुभेच्छा दिल्या आहेत. 2009 मध्ये विद्या आणि रायुडूचे लग्न झाले होते.

  • Heartiest congratulations @RayuduAmbati & Vidya on the birth of your daughter. Such a blessing! Cherish each & every moment with the little one & wishing you all lots of love & happiness! 👨‍👩‍👧💓

    — Suresh Raina🇮🇳 (@ImRaina) July 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

रायुडूने मार्च 2019 मध्ये भारतासाठी अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर रायुडूला संघात स्थान मिळालेले नाही. 2019 च्या वर्ल्डकप संघात त्याची निवड झाली नाही, तेव्हा तो निराश झाला होता. त्याने निवृत्तीची घोषणा देखील केली होती. मात्र, एका महिन्यानंतर तो क्रिकेटमध्ये परतला. त्यानंतर त्याने हैदराबादकडून घरगुती क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.