नवी दिल्ली - बीसीसीआयने गुरुवारी टीम इंडियाच्या जर्सीसाठी नवीन प्रायोजक कंपनीचे नाव घोषित केले. प्रसिद्ध ऍप म्हणून ओळख असलेले 'बायजू' आता भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर दिसणार आहे. बायजू हे शैक्षणिक ऍप असून, अभिनेता शाहरुख खान या कंपनीचा ब्रँड अँबेसिडर आहे.
-
UPDATE🚨: BYJU'S to be new #TeamIndia sponsor
— BCCI (@BCCI) July 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
More details - https://t.co/OXgn45kYrJ pic.twitter.com/Xmxt2VAZ5q
">UPDATE🚨: BYJU'S to be new #TeamIndia sponsor
— BCCI (@BCCI) July 25, 2019
More details - https://t.co/OXgn45kYrJ pic.twitter.com/Xmxt2VAZ5qUPDATE🚨: BYJU'S to be new #TeamIndia sponsor
— BCCI (@BCCI) July 25, 2019
More details - https://t.co/OXgn45kYrJ pic.twitter.com/Xmxt2VAZ5q
बीसीसीआयने सध्या भारतीय क्रिकेट संघाचा प्रायोजक असलेल्या ओप्पो कडून सर्व जबाबदाऱ्या आपल्या हाती घेतल्या. ओप्पोचा हा करार 1079 कोटी रुपयांचा होता. बीसीसीआयच्या वतीने कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी ओप्पोने दिलेल्या सोबतीबद्दल कंपनीचे आभार मानले.
शिवाय बायजूचे संस्थापक आणि सीइओ बायजू रविंद्रन यांनीही आपले नवीन प्रवासाबद्दल मत व्यक्त केले. ते म्हणाले, ‘आम्हाला भारतीय संघाचे प्रायोजक होताना अभिमान वाटत आहे. क्रिकेट हा सर्व भारतीयांसाठी श्वास आहे आणि आम्ही आमच्या आवडत्या संघाचा अविभाज्य भाग होत असल्याने आम्ही आनंदी झालो आहोत.’
नवीन प्रायोजक बायजू हे 5 सप्टेंबर 2019 ते 31 मार्च 2022 पर्यंत भारतीय संघाचे प्रायोजक असणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या मालिकेपासून टीम इंडियाच्या जर्सीवर बायजूचे नाव दिसणार आहे.