ETV Bharat / sports

इंग्लंडचा नवा कर्णधार स्टोक्स म्हणतो, ''मी माझी शैली बदलणार नाही'' - ben stokes captaincy news

आपल्या नवजात मुलाला पाहण्यासाठी रूट घरी परतला आहे. त्यामुळे तो पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्या जागी स्टोक्सला कर्णधारपद मिळाले आहे. या नियुक्तीनंतर स्टोक्स म्हणाला, ''मला नेहमीच माझ्या वचनबद्धतेने खेळाच्या पद्धतीसह एक उदाहरण मांडायचे आहे. कर्णधारपद मिळाल्यानंतरही माझी शैली बदलणार नाही.''

ben stokes says captaincy will not change his style
इंग्लंडचा नवा कर्णधार स्टोक्स म्हणतो, ''मी माझी शैली बदलणार नाही''
author img

By

Published : Jun 30, 2020, 3:36 PM IST

लंडन - इंग्लंडचा नवा कर्णधार बेन स्टोक्सने जो रूटच्या संघातील अनुपस्थितीबाबत विधान केले आहे. संघाचे कर्णधारपद सांभाळत असताना माझ्या कामगिरीत कोणताही बदल होणार नसल्याचे स्टोक्सने सांगितले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी स्टोक्सला कर्णधारपद सोपवण्यात आले आहे.

आपल्या नवजात मुलाला पाहण्यासाठी रूट घरी परतला आहे. त्यामुळे तो पहिल्या कसोटीत खेळू शकणार नाही. त्याच्या जागी स्टोक्सला कर्णधारपद मिळाले आहे. या नियुक्तीनंतर स्टोक्स म्हणाला, ''मला नेहमीच माझ्या वचनबद्धतेने खेळाच्या पद्धतीसह एक उदाहरण मांडायचे आहे. कर्णधारपद मिळाल्यानंतरही माझी शैली बदलणार नाही.''

2019च्या विश्वकरंडक स्पर्धेत नायक ठरलेला स्टोक्स म्हणाला, ''फलंदाजी आणि गोलंदाजी या दोहोंमध्ये मला सकारात्मक प्रभाव पडायचा आहे. मी नेहमी परिस्थितीनुसार सकारात्मक मार्ग निवडतो.'

अँड्र्यू फ्लिंटॉफनंतर इंग्लंडचे नेतृत्व करणारा स्टोक्स हा पहिला अष्टपैलू क्रिकेटपटू ठरला आहे. यापूर्वी बेन स्टोक्सला 2017मध्ये उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते, परंतु ब्रिस्टलमधील नाईटक्लबच्या बाहेर झालेल्या बाचाबाचीनंतर त्याने आपले स्थान गमावले. तो म्हणाला, "इंग्लंडचा कर्णधार होणे ही अभिमानाची बाब आहे. आयुष्यात एकदा तरी इंग्लंडचा कर्णधार म्हणून काम केल्याचे सुख असेल. आमच्या संघात असे अनेक अनुभवी खेळाडू आहेत, ज्यांकडून मी मत घेतो. प्रत्येकाच्या सल्ल्याने घेतलेले निर्णय चांगले असतात.''

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.