ETV Bharat / sports

सामनावीर पुरस्कार चहलला मिळायला हवा होता - स्टोक्स

आयपीएलमध्ये सोमवारी शारजाह येथे झालेल्या सामन्यात बंगळुरूच्या संघाने कोलकाताचा ८२ धावांनी पराभव केला. चहलने केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकची विकेट घेत चार षटकांत अवघ्या १२ धावा दिल्या. सामन्यानंतर स्टोक्सने ट्विट केले की, फलंदाजांच्या या सामन्यात युझवेंद्र चहलला सामनावीर म्हणून निवडले गेले पाहिजे होते. विशेषत: हा सामना शारजाहमध्ये असताना आक्रमक गोलंदाजीसाठी हा पुरस्कार चहला मिळायला हवा होता.

ben stokes feels chahal should have been man of the match
सामनावीर पुरस्कार चहलला मिळायला हवा होता - स्टोक्स
author img

By

Published : Oct 13, 2020, 4:09 PM IST

शारजाह - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलने कोलकाता नाईट रायडर्सविरूद्धच्या सामन्यात शानदार गोलंदाजी केली. या कामगिरीसाठी चहलला सामनावीर पुरस्कार मिळायला हवा होता, असे मत राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने दिले आहे.

आयपीएलमध्ये सोमवारी शारजाह येथे झालेल्या सामन्यात बंगळुरूच्या संघाने कोलकाताचा ८२ धावांनी पराभव केला. चहलने केकेआरचा कर्णधार दिनेश कार्तिकची विकेट घेत चार षटकांत अवघ्या १२ धावा दिल्या. सामन्यानंतर स्टोक्सने ट्विट केले की, फलंदाजांच्या या सामन्यात युझवेंद्र चहलला सामनावीर म्हणून निवडले गेले पाहिजे होते. विशेषत: हा सामना शारजाहमध्ये असताना आक्रमक गोलंदाजीसाठी हा पुरस्कार चहला मिळायला हवा होता.

  • In a batters game @yuzi_chahal should get MOM here,incredible figures especially as it’s in Sharjah 👏

    — Ben Stokes (@benstokes38) October 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंगळुरूने २० षटकात २ बाद १९४ धावा केल्या. अब्राहम डिव्हिलियर्सने ३३ चेंडूत ७३ धावा फटकावल्या. त्याने आपल्या खेळीत पाच चौकार व सहा षटकार ठोकले आणि त्यासाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

चहलने या मोसमात आतापर्यंत १० बळी घेतले आहेत. सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात बंगळुरूने सात सामन्यांपैकी पाच विजयांसह गुणातालिकेत तिसरे स्थान मिळवले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.