नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर, भारताचा माजी स्फोटक फलंदाज युवराज नुकताच कॅनडाच्या ग्लोबल टी-२० लीगमध्ये खेळला. या लीगमध्ये युवराजने आपल्या टोरंटो नॅशनल्स संघाचे कर्णधारपद भूषवले. युवराजच्या संघाला या स्पर्धेचे जेतेपद जिंकता आले नसले तरी युवीने स्पर्धेत केलेल्या काही भन्नाट खेळीने त्याचे चाहते खूश झाले. या स्पर्धेदरम्यान त्याचाच सहकारी असलेल्या बेन कटींगच्या प्रेयसीने एक आरोप केला आहे.
त्याचे झाले असे की, स्पर्धेदरम्यान एरिन हॉलंडने आपला प्रियकर बेनची मुलाखत घेतली होती. आणि या मुलाखतीदरम्यान, युवराज मध्ये आला होता. मुलाखत सुरु असताना त्याने दोघांना ‘लग्न कधी करणार?’ असा त्याने थेट प्रश्न केला होता. त्यांच्या या मजेशीर मुलाखतीचा व्हिडिओ ग्लोबल टी२० कॅनडाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शेअर केला. त्यानंतर, हा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल झाला.
-
When @YUVSTRONG12 crashed an interview and asked the most important question to @Cuttsy31 and @erinvholland! 😂😂😂
— GT20 Canada (@GT20Canada) July 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
HOWZZAT?#GT2019 #ERvsTN #YuvrajSingh #Canada #Brampton pic.twitter.com/l5rqONTki2
">When @YUVSTRONG12 crashed an interview and asked the most important question to @Cuttsy31 and @erinvholland! 😂😂😂
— GT20 Canada (@GT20Canada) July 27, 2019
HOWZZAT?#GT2019 #ERvsTN #YuvrajSingh #Canada #Brampton pic.twitter.com/l5rqONTki2When @YUVSTRONG12 crashed an interview and asked the most important question to @Cuttsy31 and @erinvholland! 😂😂😂
— GT20 Canada (@GT20Canada) July 27, 2019
HOWZZAT?#GT2019 #ERvsTN #YuvrajSingh #Canada #Brampton pic.twitter.com/l5rqONTki2
या स्पर्धेच्या अंतिम सामन्याआधी, स्टेडियममधील एका चाहत्याने एका पोस्टरद्वारे युवराजचाच प्रश्न एरिन आणि कटींग यांना विचारला. हे पोस्टर एरिनने स्वत: आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने 'हे सर्व तुझ्या चूकीमुळे होत आहे' असे युवीला टॅग करत म्हटले आहे.
-
Hahaha this one is all your fault @YUVSTRONG12 😂🙌🏻 #whenstheweddingguys @GT20Canada @Cuttsy31 pic.twitter.com/9XILk5mTx8
— Erin Holland (@erinvholland) August 10, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Hahaha this one is all your fault @YUVSTRONG12 😂🙌🏻 #whenstheweddingguys @GT20Canada @Cuttsy31 pic.twitter.com/9XILk5mTx8
— Erin Holland (@erinvholland) August 10, 2019Hahaha this one is all your fault @YUVSTRONG12 😂🙌🏻 #whenstheweddingguys @GT20Canada @Cuttsy31 pic.twitter.com/9XILk5mTx8
— Erin Holland (@erinvholland) August 10, 2019
यंदाच्या ग्लोबल टी२० कॅनडा स्पर्धेते जेतेपद विनीपेग हॉक्स संघाने जिंकले. विनीपेग हॉक्स आणि वँकुअर नाईट्स यांच्यातील अंतिम सामना सुपरओव्हरमध्ये गेला होता. सुपरओव्हरमध्ये वँकुअर नाईट्स संघाने एका षटकात ९ धावा बनवल्या. तर, विनीपेग हॉक्स संघाने हे आव्हान ४ चेंडूतच पूर्ण केले.