नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मंगळवारी टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षक पदासह सपोर्ट स्टाफसाठी नव्याने अर्ज मागवले आहेत. या पदाच्या नियुक्तीसाठी सर्वोच्च न्यायालयाने तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समिती नेमली आहे. ही समिती टीम इंडियाच्या प्रशिक्षकाची निवड करणार आहे.
बीसीसीआयने प्रशिक्षक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ६० पेक्षा कमी असावे. तसेच त्या उमेदवाराला किमान २ वर्षांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव असावा, अशी अट ठेवली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने प्रशिक्षक नियुक्तीसाठी गठित केलेल्या तीन सदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीचे अध्यक्षपद माजी कर्णधार कपिल देव यांच्याकडे देण्यात आले आहे. तर, अंशुमन गायकवाड व शांथा रंगास्वामी हे या समितीचे सदस्य आहेत.
'त्रिकुटा'ची समिती बरखास्त -
बीसीसीआयने यापूर्वी सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांची सल्लागार समिती नेमली होती. आता ती समिती बरखास्त करण्यात आली आहे.