ETV Bharat / sports

जाणून घ्या... कसे आहेत भुवी अन् शॉ, बीसीसीआयने दिले अपडेट

भुवनेश्वर कुमार याला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेदरम्यान दुखापत झाली होती. तर पृथ्वी शॉला रणजी करंडकातील कर्नाटक विरुद्धच्या सामन्यात खांद्याला दुखापत झाली होती.

author img

By

Published : Jan 16, 2020, 4:45 PM IST

bcci update on bhuvneshwar kumar and prithvi shaw injury
बीसीसीआयने दिले भुवी, शॉ यांच्या दुखापतीचे अपडेट, जाणून घ्या....

मुंबई - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि युवा फलंदाज पृथ्वी शॉ यांच्या तंदुरुस्तीविषयीचे अपडेट दिले आहेत. आज (गुरुवार) बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून म्हटले आहे की, ११ जानेवारीला लंडनमध्ये भुवीवर हर्नियाचे ऑपरेशन झाले. त्याचबरोबर शॉ आता पूर्णपणे तंदुरुस्त असून तो भारताच्या 'अ' संघात सामील होण्यासाठी न्यूझीलंडला रवाना झाला आहे.

भुवनेश्वर कुमार याला वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेदरम्यान दुखापत झाली होती, तर पृथ्वी शॉला रणजी करंडकातील कर्नाटक विरुद्धच्या सामन्यात खांद्याला दुखापत झाली होती.

पृथ्वीचे निवड न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय 'अ' संघात करण्यात आली. त्यानंतर त्याला दुखापत झाली. यामुळे तो न्यूझीलंड दौऱ्यातील दोन सराव सामने खेळणार की नाही, याबाबत सशांकता व्यक्त केली जात होती. तेव्हा बीसीसीआयने शॉ तंदुरुस्त झाला असून न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या भारत 'अ' संघासाठी रवाना झाला असल्याचे स्पष्ट केले आहे.

bcci update on bhuvneshwar kumar and prithvi shaw injury
पृथ्वी शॉ...

भुवीच्या तंदुरुस्तीविषयी बीसीसीआयकडून माहिती देण्यात आली आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार भारताचे फिजिओथेरपिस्ट योगेश परमार यांच्यासोबत ९ जानेवारीला लंडनला गेला होता. त्याच्यावर ११ जानेवारीला, हर्नियाची शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या झाली आहे. भुवीला आता बंगळुरूच्या नॅशनल क्रिकेट अकादमीमध्ये फिट होईपर्यंत ठेवण्यात येणार आहे.

भुवनेश्वर कुमार...

हेही वाचा - BCCI वार्षिक करार : टीम इंडियाच्या खेळाडूचा पगार किती, जाणून घ्या...

हेही वाचा - बीसीसीआयच्या करार यादीतून धोनीचे नाव 'कटाप'

Intro:Body:

sports news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.