ETV Bharat / sports

'खेलरत्न'साठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस, वाचा BCCI ने सुचवलेली नावं - क्रिकेट विषयी बातम्या

बीसीसीआयने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस केली आहे. बीसीसीआयने रोहित व्यतिरिक्त अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा यांची नावं पाठवली आहेत.

BCCI nominates Rohit Sharma for Rajiv Gandhi Khel Ratna Award
'खेलरत्न'साठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस, वाचा BCCI ने सुचवलेली नावं
author img

By

Published : May 31, 2020, 6:34 AM IST

Updated : May 31, 2020, 7:42 AM IST

मुंबई - बीसीसीआयने राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस केली आहे. बीसीसीआय दरवर्षी चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावं खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी पाठवत असते. रोहितने २०१९ विश्वकरंडकात चांगली कामगिरी केली. त्याने या स्पर्धेत ५ शतकं झळकावली. तसेच त्याने कसोटी क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून केलेलं दमदार पुनरागमन यामुळे बीसीसीआयने खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

बीसीसीआयने रोहित शर्मा व्यतिरिक्त अर्जुन पुरस्कारासाठी शिखर धवन, इशांत शर्मा आणि महिला क्रिकेटपटू दिप्ती शर्मा यांची नावं पाठवली आहेत. शिखर धवनचे नाव दुसऱ्यांदा पाठवण्यात आले आहे. या आधी त्याचे नाव २०१८ मध्ये अर्जुन पुरस्कारासाठी शर्यतीत होते. पण त्याची निवड झालेली नव्हती.

दरम्यान, जसप्रीत बुमराहचे नाव देखील अर्जुन पुरस्काराच्या शर्यतीत होते. पण अनुभवी खेळाडूंच्या समावेशामुळे बुमराहचे नाव मागे पडले. भारतीय क्रीडा क्षेत्रात खेलरत्न आणि अर्जुन पुरस्काराला मानाचे स्थान आहे. यात खेलरत्न पुरस्कारासाठी रोहितचे निवड होते का? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.

हेही वाचा - ''माझ्यावर बंदी नसती तर डिव्हिलियर्स '360' म्हणून ओळखला गेला नसता''

हेही वाचा - शाबाश लाला..! कोरोना संकटात सेहवाग देतोय गरजूंना घरगुती जेवण

Last Updated : May 31, 2020, 7:42 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.