ETV Bharat / sports

आयपीएलच्या शीर्षक प्रायोजकत्वासाठी बीसीसीआयने मागवल्या निविदा

आयपीएलने पुढे म्हटले, "ईओआय (एक्सप्रेस ऑफ इंटरेस्ट) सादर करणाऱ्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल आणि ते पात्र आढळतील. बोर्ड तिसर्‍या पक्षाला सर्वोच्च बोली लावणाऱ्याला अधिकार देण्यास बांधील नाही, हे स्पष्ट केले आहे. बीसीसीआयचा निर्णय इतरही अनेक गोष्टींवर अवलंबून असेल. मागील लेखापरीक्षण खात्यांनुसार तिसऱ्या पक्षाची आर्थिक उलाढाल ३०० कोटींपेक्षा जास्त असेल तरच ईओआय स्वीकारला जाईल. तपासलेल्या खात्यांची प्रतदेखील बिड बरोबर जमा करावी लागेल. मध्यस्थ किंवा एजंट या प्रक्रियेत भाग घेऊ शकत नाहीत आणि अशा बोली रद्द केल्या जातील."

BCCI invites bids for IPL 2020 title sponsorship
आयपीएलच्या शीर्षक प्रायोजकत्वासाठी बीसीसीआयने मागवल्या निविदा
author img

By

Published : Aug 11, 2020, 10:56 AM IST

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) तेराव्या हंगामाच्या शीर्षक प्रायोजकत्वासाठी निविदा मागवल्या आहेत. यंदाची आयपीएल स्पर्धा १९ सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये होईल. "निविदा सादर करण्याची अंतिम तारीख १४ ऑगस्ट आहे. शीर्षक प्रायोजकत्वासाठीचे हे अधिकार १८ ऑगस्ट २०२० ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीसाठी आहेत", असे आयपीएलने सांगितले.

आयपीएलने पुढे म्हटले, "ईओआय (एक्सप्रेस ऑफ इंटरेस्ट) सादर करणाऱ्यांना याबाबत सविस्तर माहिती दिली जाईल आणि ते पात्र आढळतील. सर्वोच्च बोली लावणाऱ्या तिसर्‍या पक्षाला अधिकार देण्यास बोर्ड बांधील नाही. बीसीसीआयचा निर्णय इतरही अनेक गोष्टींवर अवलंबून असेल. मागील लेखापरीक्षण खात्यांनुसार तिसऱ्या पक्षाची आर्थिक उलाढाल ३०० कोटींपेक्षा जास्त असेल तरच ईओआय स्वीकारला जाईल. तपासलेल्या खात्यांची प्रतदेखील बिड बरोबर जमा करावी लागेल. मध्यस्थ किंवा एजंट या प्रक्रियेत भाग घेऊ शकत नाहीत आणि अशा बोली रद्द केल्या जातील."

बीसीसीआयने गेल्या आठवड्यात आयपीएलच्या मुख्य प्रायोजकातून विवोला हटवण्याची घोषणा केली. जूनमध्ये भारत आणि चीन सैन्याच्या सीमेवर झालेल्या हिंसक संघर्षानंतर भारतीय बोर्ड आणि विवो यांच्यातील करार या वर्षासाठी रद्द करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, पतंजली आयपीएल २०२० च्या प्रायोजकतेसाठी बोली लावण्यावर विचार करत आहे. पतंजलीचे प्रवक्ते एस.के तिजारावाला म्हणाले, "आम्ही यावर्षी आयपीएलच्या शीर्षक प्रायोजकत्वाबद्दल विचार करत आहोत. कारण पतंजली ब्रँडला जागतिक व्यासपीठावर नेण्याची आमची इच्छा आहे."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.