ढाका - बांग्लादेशचा संघ एप्रिल महिन्यात श्रीलंकेचा दौरा करणार आहे. उभय संघात दोन कसोटी सामन्याची मालिका खेळली जाणार आहे.
बांग्लादेश-श्रीलंका यांच्यात मागील वर्षी कसोटी मालिका खेळली जाणार होती. पण कोरोनामुळे ही मालिका स्थगित करण्यात आली होती. आता त्या मालिकेचे आयोजन एप्रिल महिन्यात करण्यात आले आहे.
बांग्लादेश बोर्डाने या मालिकेबाबत दुजोरा दिला आहे. परंतु, अद्याप श्रीलंकेकडून मालिकेबाबत घोषणा करण्यात आलेली नाही. पण १२ ते १५ एप्रिल यादरम्यान बांग्लादेशचा संघ श्रीलंका दौरा करू शकतो.
उभय संघातील कसोटी मालिका आणि आयपीएलच्या तारखा एक येण्याची शक्यता आहे. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने शाकिब अल हसन आणि मुस्तफिजूर रहमानला आयपीएल खेळण्यासाठी परवानगी दिली आहे. यामुळे बांग्लादेश संघाला या दोघांशिवाय मालिका खेळावी लागण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियात 'जोकोव्हिच'ची सत्ता, नवव्यांदा जिंकली स्पर्धा
हेही वाचा - टीम इंडियात निवड झाल्यानंतर सूर्यकुमारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला...