ढाका - सर्व काही नियोजनानुसार झाल्यास बांगलादेशचा क्रिकेट संघ यावर्षी ऑक्टोबरमध्ये श्रीलंका दौरा करू शकतो, असे बांगलादेश आणि श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या चर्चेतून समोर आले आहे. यापूर्वी हा दौरा जुलै ते ऑगस्ट दरम्यान होणार होता, परंतु साथीच्या आजारामुळे पुढे ढकलण्यात आला.
एका वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने टी-20 वर्ल्डकप पुढे ढकलल्यानंतर, दोन्ही बोर्ड लवकरच ही मालिका खेळवण्यास उत्सुक आहेत. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी म्हणाले, ''आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धांच्या घोषणेनंतर आपण कोणत्या विंडोवर काम करू शकतो हे समजले आहे. स्पर्धेची तारीख निश्चित झाली आहे. त्यामुळे आम्ही आमच्या वेळापत्रकात काम करू शकतो."
ते म्हणाले, "या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या कसोटी मालिकेबाबत दोन्ही मंडळे सकारात्मक आहेत. श्रीलंका क्रिकेट बोर्डाशी (एसएलसी) आम्ही चर्चेत आहोत. इतर उपखंडातील देशांपेक्षा श्रीलंकेत सध्या कोरोनाच्या बाबतीत अधिक चांगली स्थिती आहे. आमच्याकडे परिस्थिती अनुकूल नसल्यामुळे आम्ही घराबाहेरच्या सामन्यांसाठी अधिक उत्सुक आहोत."