कोलकाता - आयपीएलच्या आगामी म्हणजेच तेराव्या हंगामासाठी गुरुवारी खेळाडूंची लिलाव प्रक्रिया पार पडली. या लिलावात अनेक देशी-विदेशी खेळाडूंनी आपले नशीब आजमावले. मात्र, २०२० मध्ये रंगणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटपटू नशीबवान ठरले आहेत.
हेही वाचा - राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत राही सरनोबतला सुवर्ण, 41 गुणांची कमाई करत रचला विक्रम
या लिलावात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंना कोट्यवधी रुपयांची किंमत मिळाली. वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स हा लिलाव प्रक्रियेतील सर्वात महागडा खेळाडू ठरला. कोलकाता नाईट रायडर्सने १५ कोटी ५० लाख इतकी किंमत मोजून पॅट कमिन्सला खरेदी केले. कमिन्सव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाच्या इतर मोठ्या खेळाडूंचाही लिलावात मोठी बोली लागली आहे.
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू -
- पॅट कमिन्स, गोलंदाज, केकेआर, १५.५० करोड
- ग्लेन मॅक्सवेल, अष्टपैलू, पंजाब, १०.७५ करोड
- नॅथन कुल्टर नाइल, अष्टपैलू, मुंबई, ८ करोड
- मार्कस स्टॉइनिस, अष्टपैलू, दिल्ली, ४.८० करोड
- ख्रिस लिन, फलंदाज, मुंबई, २ करोड
कोलकातामध्ये झालेल्या या लिलावासाठी ९७१ खेळाडूंनी नोंदणी केली होती. यातील ३३२ खेळाडूंना बीसीसीआयने निवडले होते. मात्र, गुरुवारी या यादीत आणखी सहा खेळाडूंची नावे समाविष्ट करण्यात आली. यामुळे ३३२ ऐवजी ३३८ खेळाडूंवर बोली लागली.