अॅडलेड - ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघात सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या व अंतिम सामन्यात सलामीवीर डेव्हिड वॉर्नरने द्विशतक झळकावले. त्याने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीच्या गोलंदाजीवर आपले द्विशतक पूर्ण केले. वॉर्नरचे हे दुसरे द्विशतक असून त्याने ८१ कसोटी खेळताना २३ शतके झळकावली आहेत.
अॅशेस मालिकेत डेव्हिड वॉर्नर अपयशी ठरला. त्याला इंग्लंडविरुध्दच्या ५ कसोटी सामन्यात अवघ्या ९५ धावा करता आल्या. या मालिकेनंतर त्याने पाकिस्तान विरुध्दच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत दबाव झुगारून खोऱ्याने धावा जमवल्या. विशेष म्हणजे, पाक विरुध्दच्या मागील पाच डावात त्याने ४ शतके ठोकली आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान संघात अॅडलेड येथे दुसरा व अंतिम दिवस-रात्र कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यात वॉर्नरचे नाबाद द्विशतक (२६६) आणि मार्नस लाबुशेनच्या (१६२) शतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने मोठी धावसंख्या उभारण्याकडे वाटचाल सुरू केली आहे. दुसऱ्या दिवशी चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाने २ बाद ४७४ धावा केल्या. वॉर्नर २६१ आणि स्टीव्ह स्मिथ ३३ धावांवर खेळत होते.
हेही वाचा - तेरा ध्यान किधर है..! पाकच्या खेळाडूचे अजब क्षेत्ररक्षण...व्हिडिओ पाहून तुम्हीही हसाल
हेही वाचा - IND vs WI : भारत दौऱ्यासाठी विडींजच्या संघात ना गेल..ना रसेल...ना ब्राव्हो..!
हेही वाचा - हॅमिल्टन कसोटी : उभय संघाला दुखापतीचे ग्रहण; बोल्ट, ग्रँडहोम नंतर इंग्लंडचा 'हा' खेळाडू जायंबदी