सिडनी - गतविजेता ऑस्ट्रेलियाचा संघ आयसीसी विश्वचषक-२०१९ च्या स्पर्धेत नव्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. मंगळवारी ऑस्ट्रेलियाकडून आपल्या नव्या जर्सीचे अनावरण करण्यात आले आहे. कांगारू संघाने आपल्या जर्सीसाठी पारंपरिक पिवळ्या आणि हिरव्या रंगाचा वापर कलेला आहे.
ऑस्ट्रेलिया संघासाठी जर्सी बनवणाऱ्या ASICS या कंपनीने ग्लेन मॅक्सवेलचा नव्याकोऱ्या जर्सीतील फोटो शेयर करत नव्या जर्सीचे अनावरण केले. या नव्या जर्सीत पाच वेळचा विश्वचषक विजेता आणि गतविजेता असलेला ऑस्ट्रेलियन संघ विक्रमी सहाव्यांदा विश्वचषक उंचावणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
-
Introducing the new shirt to take on the worlds best! The countdown is on for the World Cup! https://t.co/qIL117ecce #ReachTheUnreachable #MoveAsOne @CricketAus @Gmaxi_32 pic.twitter.com/fj2ZqoD6oY
— ASICS Australia (@ASICSaustralia) April 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Introducing the new shirt to take on the worlds best! The countdown is on for the World Cup! https://t.co/qIL117ecce #ReachTheUnreachable #MoveAsOne @CricketAus @Gmaxi_32 pic.twitter.com/fj2ZqoD6oY
— ASICS Australia (@ASICSaustralia) April 9, 2019Introducing the new shirt to take on the worlds best! The countdown is on for the World Cup! https://t.co/qIL117ecce #ReachTheUnreachable #MoveAsOne @CricketAus @Gmaxi_32 pic.twitter.com/fj2ZqoD6oY
— ASICS Australia (@ASICSaustralia) April 9, 2019
चेंडू छेडछाड प्रकरणात दोषी आढळलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांची बंदी मार्च महिन्याच्या अखेरीस संपुष्टात आली आहे. त्यामुळे ते विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियन संघात परतण्याची दाट शक्यता आहे. ते संघात परतल्यास कांगारूंचा संघ हा अधिक मजबूत होणार आहे.
विश्वचषक स्पर्धेला ३० मेपासून इंग्लंड आणि वेल्समध्ये सुरुवात होणार असून ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना १ जूनला अफगाणिस्तानशी होणार आहे.