सिडनी - ऑस्ट्रेलियाने मायदेशात खेळताना न्यूझीलंड संघाचा कसोटी मालिकेत ३-० ने सफाया केला. तिसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघाने न्यूझीलंडचा २७९ धावांनी पराभव केला. फिरकीपटू नॅथन लायनचे ५ बळी आणि त्याला मिचेल स्टार्कच्या प्रभावी माऱ्याची साथ मिळाली. याच जोरावर ऑस्ट्रेलियाने विजय साकारला. दमदार कामगिरी केलेल्या मार्नस लाबूशेनला सामनावीर तसेच मालिकावीर असा दुहेरी सन्मान मिळाला.
-
Three-nil.#AUSvNZ pic.twitter.com/LkfIsrVvDu
— cricket.com.au (@cricketcomau) January 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Three-nil.#AUSvNZ pic.twitter.com/LkfIsrVvDu
— cricket.com.au (@cricketcomau) January 6, 2020Three-nil.#AUSvNZ pic.twitter.com/LkfIsrVvDu
— cricket.com.au (@cricketcomau) January 6, 2020
ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यासमोर न्यूझीलंडचा दुसरा डाव अवघ्या १३६ धावांत आटोपला. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव २१७ धावांवर घोषित केला आणि पहिल्या डावातील आघाडी मिळून न्यूझीलंडला ४१६ धावांचे लक्ष्य मिळाले. दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नर (१११) आणि मार्नस लाबुशेनने (५९) दमदार खेळी केली.
ऑस्ट्रेलियाने दिलेल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यात, न्यूझीलंड संघ सपशेल अपयशी ठरला. नॅथन लिओनने ५० धावांत ५ गडी बाद करत न्यूझीलंडची फलंदाजी कापून काढली. तर त्याला मिचेल स्टार्कने ३ गडी बाद करत चांगली साथ दिली. मार्नस लाबुशेनने या मालिकेसह मागील पाच सामन्यात चांगली छाप सोडली. त्याने ५ सामन्यात ८९६ धावा केल्या.
दरम्यान, दुसऱ्या डावात डेव्हिड वॉर्नरने फलंदाजी करताना खेळपट्टीच्या डेंजर झोनमधून धाव घेतली. तेव्हा पंचांनी ऑस्ट्रेलिया संघाला ५ धावांची पेनल्टी लावली. यामुळे ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येतून ५ धावा कमी करण्यात आल्या.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात मार्नस लाबुशेनच्या द्विशतकाच्या जोरावर ४५४ धावा केल्या होत्या. प्रत्तुत्तरादाखल न्यूझीलंडचा संघ २५६ धावा करु शकला. नॅथन लिओनने पहिल्या डावात ५ गडी टिपले.
हेही वाचा - #HBDKapilDev : क्रिकेटच्या कारकिर्दीत कधीही 'रनआऊट' न झालेला क्रिकेटपटू
हेही वाचा - टेलरचा फ्लेमिंगला 'ओव्हरटेक', ठरला न्यूझीलंडचा सर्वात यशस्वी कसोटी फलंदाज