मेलबर्न - न्यूझीलंड विरुद्धच्या 'बॉक्सिंग डे' कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाने आपला अंतिम संघ जाहीर केला आहे. या संघात सलामीवीर डेव्हिड वॉर्नरचा समावेश करण्यात आला आहे. पण सोमवारी सरावादरम्यान वॉर्नरला दुखापत झाली. यामुळे तो ही कसोटी खेळणार की नाही, याबाबत साशंकता आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात २६ डिसेंबरपासून बॉक्सिंग डे कसोटीला सुरूवात होणार आहे. मात्र, सोमवारी सरावादरम्यान, डेव्हिड वॉर्नरच्या अंगठ्याला दुखापत झाली. यामुळे त्याने सराव सत्रातून माघार घेतली.
आज ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी सांगितले की, 'मला सुरूवातीला वॉर्नरच्या दुखापतीविषयी चिंता वाटली. परंतु, मी जेव्हा डॉक्टरांशी बोलले. तेव्हा त्यांनी सगळं काही ठिक असल्याचे सांगितले. वॉर्नर सद्या लयीत असून तो आमच्यासाठी महत्वाचा खेळाडू आहे. बॉक्सिंग डे कसोटीत खेळण्यासाठी तो आतूर आहे.'
वॉर्नरने आज सकाळी जवळपास ४५ मिनिटांपर्यंत सराव केला. पण या सरावादरम्यानही तो विव्हळताना दिसला. पण लँगर यांनी वॉर्नर कसोटी खेळणार असे सांगितलं आहे. दरम्यान, उभय संघात तीन सामन्यांची कसोटी मालिका सुरू असून पहिला सामना ऑस्ट्रेलियाने २९६ धावांनी जिंकत १-० अशी आघाडी घेतली आहे.
हेही वाचा - IPL २०२० : आयपीएल संघमालकांची उडाली झोप, 'हे' आहे कारण
हेही वाचा - पाकिस्तानच्या संघाने विराटकडून शिकावे, पाक खेळाडूचा सल्ला