ETV Bharat / sports

चुरशीचा सामना जिंकत टीम इंडियाने पटकावला 'आशिया चषक', मुंबईचा अथर्व ठरला हिरो

भारताच्या गोलंदाजांनी बांगलादेशच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठू दिला नाही. मात्र, बांगलादेशच्या तळाच्या फलंदाजांनी जिद्द सोडली नाही आणि ते अखेर पर्यंत लढले. पण त्यांना अवघ्या ५ धावांनी जेतेपदाला मुकावे लागले. दरम्यान, भारतीय संघाने आशिया चषक सातव्यांदा पटकावला आहे.

चुरसीचा सामना जिंकत टीम इंडियाने पटकावला 'आशिया चषक', मुंबईचा अथर्व ठरला हिरो
author img

By

Published : Sep 14, 2019, 5:39 PM IST

Updated : Sep 14, 2019, 5:45 PM IST

कोलंबो - चुरशीच्या सामन्यात १९ वर्षाखालील भारतीय संघाने बांगलादेशचा पराभव करत आशिया चषक पटकावला. भारताचा डाव १०६ धावांमध्ये आटोपला. तेव्हा बांगालदेश सहज विजय मिळवून आशिया चषकावर नाव कोरेल असा अंदाज होता. मात्र, मुंबईच्या अथर्व अंकोलेकरसह भारतीय गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करत बांगलादेशचा पराभव केला. अथर्वने २८ धावांमध्ये ५ गडी बाद करत बांगलादेशी फलंदाजीला खिंडार पाडले.

भारताच्या गोलंदाजांनी बांगलादेशच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठू दिला नाही. मात्र, बांगलादेशच्या तळाच्या फलंदाजांनी जिद्द सोडली नाही आणि ते अखेर पर्यंत लढले. पण त्यांना अवघ्या ५ धावांनी जेतेपदाला मुकावे लागले. दरम्यान, भारतीय संघाने आशिया चषक सातव्यांदा पटकावला आहे.

अंतिम सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, कर्णधार ध्रुवचा निर्णय फसला. सवेश पारकर (४), अर्जुन आझाद (०) आणि तिलक वर्मा (२) हे आघाडीचे तिनही फलंदाज अवघ्या ८ धावांवर माघारी परतले. तेव्हा कर्णधार ध्रुव जुरेल (३३) आणि शास्वत रावत (१९) यांनी काही काळ संघर्ष केला. हे दोघे बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाज ढेपळले आणि भारतीय संघ ३२.४ षटकात १०६ धावांवर आटोपला. बांगलादेशच्या मृत्यूंजय चौधरी (३/१८) आणि शमीम होसैन (३/८) यांनी टीम इंडियाचे फलंदाच्या फलंदाजांना खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही.

भारताच्या १०६ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशचीही तारांबळ उडाली. आकाश सिंग आणि अथर्व अंकोलेकर यांनी बांगलादेशच्या फलंदाजांना झटपट माघारी पाठवले. बांगलादेशचे आघाडीचे ४ फलंदाज अवघ्या १६ धावांमध्ये माघारी परतले. तेव्हा कर्णधार अकबल अलीने संघाची पडझड रोखली. पंरतु, अथर्वने अलीला बाद केले.

अली बाद झाल्यानंतर बांगलादेशची फलंदाजी कोसळली. तेव्हा गोलंदाजीत कमाल करणाऱ्या बांगलादेशच्या मृत्यूंजय चौधरीने फलंदाजीतही बहुमुल्य योगदान दिले. त्याने २१ धावा केल्या. बांगलादेशची अवस्था ८ बाद ७८ असताना भारताचा विजय पक्का समजला जात होता. पण, तनझीब हसन सकीब व रकिबुल हसन यांनी कडवा संघर्ष केला. या दोघांनी २३ धावांची भागीदारी केली. मात्र, ते बांगलादेशला विजय मिळवून देऊ शकले नाही. बांगलादेशचा संपूर्ण संघ १०१ धावांवर आटोपला आणि भारताने हा सामना ५ धावांनी जिंकला.

Intro:Body:

sports marathi

Conclusion:
Last Updated : Sep 14, 2019, 5:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.