ETV Bharat / sports

आर.अश्विनकडे तामिळनाडू संघाचे नेतृत्व, मुरली विजयचा पत्ता कट

author img

By

Published : Feb 9, 2019, 7:59 AM IST

गुरुवारी तामिळनाडू संघाची घोषणा करण्यात आली. पण त्या संघात मुरली विजयला स्थान देण्यात आले नाही. खराब फॉर्ममुळे त्याचा पत्ता कट करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आर अश्विन

मुंबई - भारतीय कसोटी संघाचा स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन हा मुश्ताक अली टी-२० ट्रॉफीत तामिळनाडू संघाचे नेतृत्व करणार आहे. ही मालिका २१ फेब्रुवारीपासून ते २ मार्च दरम्यान होणार आहे. गुरुवारी घोषणा करण्यात आलेल्या संघात मुरली विजयला स्थान देण्यात आले नाही. खराब फॉर्ममुळे त्याचा पत्ता कट करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

युवा अष्टपैलू खेळाडू वाशिंग्टन सुंदरचे संघात पुनरागमन झाले आहे. त्याला संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारतीय टी-२० संघासोबत न्यूझीलंड दौऱ्यावर असलेल्या विजय शंकरचाही संघात समावेश करण्यात आला आहे.

मागील वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा अंतिम सामना दिल्ली आणि राजस्थान यांच्यात झाला होता. ज्यात दिल्लीने राजस्थानच्या संघाला ४१ धावांनी पराभूत करत चषकावर नाव कोरले होते.

तमिळनाडूचा संघ -

आर. अश्विन (कर्णधार), एमएस वाशिंग्टन सुंदर, एन जगदीशन, सी. हरी निशांत, एम. शाहरुख खान, बी. इंद्रजीत, आर. विवेक, टी नटराजन, एम मोहम्मद, जे कौशिक, आर साइ किशोर, एम अश्विन, एनएस चतुर्वेद, विजय शंकर, वीए डेविडसन आणि अभिषेक तंवर

Intro:
परिवहनच्या बस दरात ज्येष्ठांना ५० टक्के विशेष सवलत
नागरिकांनी अर्ज भरून देण्याचे परिवहन सेवेचे आवाहनBody:
ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेकडून महापालिका हद्दीतील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्यात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णय महासभेने मंजूर केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यास महापालिका आयुक्तांनी मंजुरी दिली असून नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन सेवेच्यावतीने करण्यात आले आहे.
ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेकडुन ज्येष्ठ नागरिकांना प्रवासी भाड्यात सवलत देण्याकरिता महासभेत प्रस्ताव सादर करण्यात आला होता या प्रस्तावास राज्य शासनाच्या ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवण्यात आलेल्या निकषांच्या आधारे चर्चा करून मंजूरी देण्यात आली आहे. यापुढे परिवहन सेवेकडून प्रवासी भाड्यात ज्येष्ठांना ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
परिवहन सेवेच्या या सवलतीसाठी ज्येष्ठ नागरिकांना ठाणे महापालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे .सवलतीचा अर्ज भरून त्या सोबत वय निश्चितीसाठी आधारकार्डची झेरॉक्स जोडून परिवहन सेवेच्या ठाणे शहरातील लोकमान्यनगर बस टर्मिनस,बी केबिन शिवाजी नगर, आनंदनगर आगार, वृंदावन सोसायटी बस टर्मिनस, कळवा डेपो, मुल्लाबाग डेपो येथील नियंत्रण कक्षात येथे अर्ज सादर करावेत.ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेकडून ज्येष्ठांसाठी ही विशेष सलवत देण्यात आली असून नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन सेवेच्यावतीने करण्यात आले आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.