ETV Bharat / sports

याला म्हणतात खरी 'खिलाडूवृत्ती', मैदानावरील शत्रूत्व विसरून दोन्ही संघाचे एकत्रित 'सेलिब्रेशन' - अॅशेस विषयी बातमी

यंदाची अॅशेस मालिका विविध कारणांनी गाजली. त्यात प्रामुख्याने एक गोष्ट घडली ती म्हणजे 'खिलाडूवृत्ती.' मालिका बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मैदानावरील शत्रूत्व विसरून खरी खिलाडीवृत्ती दाखवली. या दोनही संघांनी एकत्रितपणे सेलिब्रेशन केले.

एकत्रित सेलिब्रेशन करताना दोन्ही संघाचे खेळाडू
author img

By

Published : Sep 17, 2019, 5:20 PM IST

लंडन - नुकतीच इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघामध्ये प्रतिष्ठित अॅशेस मालिका पार पडली. इंग्लंडने अनुभवी जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने भेदक गोलंदाजीच्या जोरावर अखेरचा सामना जिंकत मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. तब्बल ४७ वर्षानंतर अ‍ॅशेस कसोटी मालिका अनिर्णित राहिली. ऑस्ट्रेलियाला अखेरचा सामना जिंकून अथवा अनिर्णयीत राखून मालिका जिंकणे शक्य झाले नाही. पण त्यांनी अॅशेस करंडक आपल्याकडे राखला.

हेही वाचा - इंग्लंडचा ऑस्ट्रेलियावर १३५ धावांनी विजय, अॅशेस मालिका २-२ ने बरोबरीत

यंदाची अॅशेस मालिका विविध कारणांनी गाजली. त्यात प्रामुख्याने फलंदाजी, गोलंदाजी काही वेळा तर यष्टीरक्षणाच्या बाबतीतही खेळाडूंनी चाहत्यांच्या टाळ्या मिळवल्या. इंग्लंड विरुध्द ऑस्ट्रेलियाचा सामना म्हणजे, स्लेजिंग तर आलचं. मैदानावर प्रेक्षकांचे हुर्रेही आलेच. अशा अनेक घटना या मालिके दरम्यान घडल्या. मात्र, याला सोडून आणखी एक गोष्ट घडली ती 'खिलाडूवृत्ती.' मालिका बरोबरीत सुटल्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी मैदानावरिल शत्रूत्व विसरून खरी खिलाडीवृत्ती दाखवली. या दोनही संघांनी एकत्रितपणे सेलिब्रेशन केले. इंग्लंड क्रिकेट मंडळाने या संदर्भातील फोटो आणि व्हिडीओ ट्विट केला आहे.

हेही वाचा - ८६७ षटकानंतर फेकला पहिला 'नो बॉल', अन्...वाचा कोण आहे कमनशिबी गोलंदाज

अॅशेस मालिकेच्या सुरुवातीला चेंडू छेडछाड प्रकरणात शिक्षा भोगून मैदानात उतरलेल्या डेव्हिड वार्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमरुन बेनक्रॉफ्ट यांची प्रेक्षकांनी हुर्रे उडवली. काहींनी तर स्मिथला 'चीटर' म्हणून हिणवले. पण, स्मिथने अख्खी मालिका गाजवली. तेव्हा शेवटी प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्या वाजवल्या. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनीही मैदानात एकमेकांविरोधात भरपूर स्लेजिंग केले, पण मालिका संपल्यानंतर मात्र दोन संघांच्या खेळाडूंनी मैदानावरील शत्रूत्व विसरुन खरी खिलाडूवृत्ती दाखवली. याचेच कौतुक सध्या क्रिकेटविश्वात होत आहे.

  • This is what Ashes cricket is all about! 🏴󠁧󠁢󠁥󠁮󠁧󠁿🇦🇺

    Which conversation would you join? 🤔 pic.twitter.com/jHWdINQJ4m

    — England Cricket (@englandcricket) September 16, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

Sports

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.