मुंबई - डावखुरा युवा वेगवान गोलंदाज आणि दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन याला शनिवारी प्रथमच मुंबईच्या वरिष्ठ संघात स्थान देण्यात आले. सय्यद मुश्ताक अली चषकासाठी 22 जणांच्या संघाच्या निवडी घोषणा झाली आहे.
मुंबई संघाचे मुख्य निवडकर्ता सलील अंकोला यांनी याची पुष्टी केली. अर्जुनशिवाय वेगवान गोलंदाज कृतिक. एचला देखील संघात स्थान देण्यात आले आहे. एमसीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, "यापूर्वी बीसीसीआयने 20 सदस्यांची निवड करण्यास सांगितले होते. पण, नंतर 22 सदस्यांचा निवडीला मंजुरी देण्यात आली."
अर्जुनची निवड पहिल्यांदाच वरिष्ठ संघात
अर्जुनची निवड पहिल्यांदाच वरिष्ठ संघात झाली आहे. यापूर्वी तो मुंबईसाठी विविध वयोगटातील स्पर्धांमध्ये खेळत आला आहे. यापूर्वी तो भारतीय संघासाठी नेटवर गोलंदाजी करत होता. श्रीलंका दौर्यावर गेलेल्या १९ वर्षांखालील भारताच्या संघातही तो खेळला आहे. मुंबईच्या संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव असून 10 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत मुंबईला सर्व सामने घरच्या मैदानावर खेळायला मिळणार आहेत.