कोलकाता - आगामी सय्यद मुश्ताक अली टी -२० स्पर्धेसाठी अभिमन्यू ईश्वरनच्या जागी अनुस्तुप मजूमदार याला बंगाल संघाचा कर्णधार म्हणून नेमण्यात आले आहे. बंगाल क्रिकेट असोसिएशनने (कॅब) याविषयी माहिती दिली.
असोसिएशनने म्हटले आहे की, केवळ टी-२० स्पर्धेसाठी मजूमदारला कर्णधारपद देण्यात आले आहे. १० जानेवारीपासून सुरू होणार्या या स्पर्धेसाठी श्रीवत्स गोस्वामीला संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अध्यक्ष अविषेक दालमिया आणि सचिव स्नेहाशिष गांगुली यांनी ईश्वरन, गोस्वामी आणि मजूमदार यांची भेट घेऊन त्यांना या निर्णयाविषयी माहिती दिली.
हेही वाचा - उमेश यादवच्या घरी नव्या पाहुण्याचे आगमन, ट्विट करून दिली माहिती
मागील वर्षी ईश्वरनने मनोज तिवारीकडून कर्णधारपद स्वीकारले. त्याच्या नेतृत्वात बंगालने रणजी करंडक स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत मजल मारली होती. नेतृत्वाच्या भारामुळे ईश्वरनला फलंदाजीत करिष्मा दाखवता आला नाही. त्याला १० सामन्यात १७.२०च्या सरासरीने धावा करता आल्या.
बंगालला ब गटात स्थान देण्यात आले आहे. संघाचे सर्व सामने कोलकाता येथे खेळले जातील.
संघ : अनस्तुप मजूमदार (कर्णधार), श्रीवत गोस्वामी (उप-कर्णधार), अभिमन्यु ईश्वरन, मनोज तिवारी, सुदी चॅटर्जी, ईशान पोरेल, ऋत्विक रॉय चौधरी, विवेक सिंह, शाहबाज अहमद, अर्णब नंदी, मुकेश कुमार, आकाशदीप, अभिषेक दास, मोहम्मद कैफ, अरित्रा चटर्जी, सुवणकर बाळ, हृतिक चटर्जी, प्रयास रे बर्मन, कैफ एहमाद, रवीकांत सिंह.