नवी दिल्ली - कला आणि क्रीडा विश्वातील 'पॉवर' कपल म्हणून विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी ओळखली जाते. सोशल मीडियामध्येही त्यांच्या फोटोंची क्रेझ पाहिली जाते. सध्या विराट आणि अनुष्का दोघेही एकमेकांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. या दरम्यान विराटने अनुष्काला 'बेस्ट फोटोग्राफर'ची उपमा दिली.
हेही वाचा - कोहली ठरला क्रिकबझच्या दशकातील सर्वोत्तम एकदिवसीय संघाचा कर्णधार
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली सध्या पत्नी अनुष्का शर्मासमवेत स्वित्झर्लंडमध्ये सुट्टीवर आहे. दरम्यान, त्याने आपल्या पत्नीचे सर्वोत्कृष्ट फोटोग्राफर म्हणून वर्णन केले. कोहलीने मंगळवारी स्वत: चा एक फोटो ट्विट केला. 'जेव्हा तुमच्याकडे अनुष्का शर्मासारखी 'बेस्ट फोटोग्राफर' असेल तर फोटो खराब येईल, अशी काळजी करण्याची गरज नाही', असे विराटने या ट्विटमध्ये म्हटले आहे.
-
No stress about pictures when you’ve got the best photographer taking them for you 😃😍 @AnushkaSharma pic.twitter.com/uK3XO4dFhZ
— Virat Kohli (@imVkohli) December 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">No stress about pictures when you’ve got the best photographer taking them for you 😃😍 @AnushkaSharma pic.twitter.com/uK3XO4dFhZ
— Virat Kohli (@imVkohli) December 31, 2019No stress about pictures when you’ve got the best photographer taking them for you 😃😍 @AnushkaSharma pic.twitter.com/uK3XO4dFhZ
— Virat Kohli (@imVkohli) December 31, 2019
कोहली आणि अनुष्का सध्या स्वित्झर्लंडमध्ये आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा करत आहेत. डिसेंबर २०१७ मध्ये या दोघांचे लग्न झाले. वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर कोहलीने ब्रेक घेतला असून श्रीलंकेविरुद्धच्या पुढील मालिकेपूर्वी सुट्टीचा आनंद घेत आहे.