ETV Bharat / sports

रसेलव्यतिरिक्त भारताच्या 'या' क्रिकेटपटूची एलपीएलमधून माघार

author img

By

Published : Oct 27, 2020, 3:02 PM IST

आंद्रे रसेल गुडघ्याच्या दुखापतीमुळे ही लीग खेळू शकणार नाही. तर, डु प्लेसिस, मिलर आणि मलान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्यांनी एलपीएलमधून माघार घेतली आहे.

andre russell faf du plessis david miller pull out of lanka premier league
रसेलव्यतिरिक्त भारताच्या 'या' क्रिकेटपटूची एलपीएलमधून माघार

कोलंबो - लंका प्रीमियर लीगच्या प्रतीक्षेत असलेल्या क्रिकेट चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. आंद्रे रसेल, फाफ डु प्लेसिस, डेव्हिड मिलर आणि डेव्हिड मलान या क्रिकेटपटूंनी एलपीएल लीगमधून माघार घेतली आहे. ही लीग २१ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर अशी रंगणार आहे.

स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल गुडघ्याच्या दुखापतीमुळे ही लीग खेळू शकणार नाही. तर, डु प्लेसिस, मिलर आणि मलान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेत सहभागी होणार आहेत. त्यामुळे त्यांनी एलपीएलमधून माघार घेतली आहे. याशिवाय, यष्टीरक्षक फलंदाज मनविंदर बिस्लावनेही या स्पर्धेतून माघार घेतली आहे. बिस्लाने आयपीएलमध्ये ३५ सामने खेळले आहेत.

लंका प्रीमियर लीग -

या स्पर्धेत पाच फ्रेंचायझी सहभागी होतील. प्रत्येक फ्रेंचायझीमध्ये एकूण १९ खेळाडू असतील, ज्यात सहा परदेशी आणि श्रीलंकेचे १३ खेळाडू असतील. ही स्पर्धा २८ ऑगस्ट ते २० सप्टेंबर दरम्यान खेळली जाणार होती, परंतू कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली. २३ सामन्यांची एलपीएल लीग डम्बुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, पाल्लेकल आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम आणि सुरीयावेवा महिंदा राजपक्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळली जाईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.