दुबई - अमेरिकेचा क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच टी-ट्वेन्टी सामना खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. युनायटेड अरब अमीरात विरुद्ध होणाऱ्या मालिकेसाठी सौरभ नेत्रवलकरच्या नेतृत्वात १४ सदस्यीय संघ अमेरिकेने जाहिर केला आहे. या दौऱ्यात अमेरिका २ टी-ट्वेन्टी तसेच एकदिवसीय सामने खेळणार आहे.
🇺🇸@usacricket have announced a 14-member squad for their tour of Dubai in March, which will see them play their first-ever T20I.
— ICC (@ICC) February 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
FULL STORY ⬇️https://t.co/iGUbmAczG1 pic.twitter.com/mSVvzC9I0i
">🇺🇸@usacricket have announced a 14-member squad for their tour of Dubai in March, which will see them play their first-ever T20I.
— ICC (@ICC) February 28, 2019
FULL STORY ⬇️https://t.co/iGUbmAczG1 pic.twitter.com/mSVvzC9I0i🇺🇸@usacricket have announced a 14-member squad for their tour of Dubai in March, which will see them play their first-ever T20I.
— ICC (@ICC) February 28, 2019
FULL STORY ⬇️https://t.co/iGUbmAczG1 pic.twitter.com/mSVvzC9I0i
अमेरिका संघाचे निवडकर्ते रिकार्डो पॉवेल म्हणाले, युनायटेड अमिरात दौरा आयसीसीच्या दुसऱया स्तरावरील क्रिकेट लीगच्या तयारीसाठी महत्वपूर्ण आहे. या स्पर्धेद्वारे एकदिवसीय संघाचा दर्जा प्राप्त करणे, हे आमचे ध्येय आहे. अमेरिकेचे प्रशिक्षक पुबुडू दस्सानायके म्हणाले, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अमेरिकेला यायला खूप उशीर झाला. आम्ही आता युनायटेड अरब अमिरातच्या आव्हानाला तयार आहोत. याद्वारे आम्ही एकदिवसीय संघाचा दर्जा प्राप्त करण्यावर भर देणार आहोत.
एप्रिल महिन्यात नामिबिया येथे आयसीसीच्या दुसऱया स्तरावर होणाऱ्या क्रिकेट लीग स्पर्धेसाठी अमेरिका संघ तयारी करत आहे. एकदिवसीय क्रिकेट खेळणाऱ्या देशाचा दर्जा मिळवण्यासाठी अमेरिका तयारी करत आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी ३७ वर्षाचा झेव्हिअर मार्शल या फलंदाजाचे अमेरिकेच्या संघात पुनरागमन झाले आहे. त्याने विंडीजकडून ३७ एकदिवसीय सामने खेळले आहेत.
अमेरिका संघ
सौरभ नेत्रवलकर (कर्णधार), एल्मोरे हचिन्सन, अॅरोन जोन्स, नोस्तुश केन्जीगे, मुहम्मद अली खान, जान निसार खान, जस्करन मल्होत्रा, झेव्हिअर मार्शल, मोनंक पटेल, तिमिल पटेल, रॉय सिल्वा, जसदीप सिंग, स्टीव्ह टेलर आणि हेडन वॉल्श ज्यूनिअर