कराची - पाकिस्तानचा अष्टपैलू क्रिकेटपटू इमाद वसीम याच्या घरी गोंडस मुलीचे आगमन झाले आहे. इमादची पत्नी सानिया अश्फाकने एका मुलीला जन्म दिला आहे. इमादने ट्विटद्वारे ही माहिती दिली.
यूकेमध्ये जन्मलेला पाकिस्तानी क्रिकेटपटू इमादने २४ ऑगस्ट २०१९ रोजी ब्रिटिश-पाकिस्तानी सानिया अश्फाकशी लग्न केले. नातेवाईक आणि मित्रांच्या उपस्थितीत या दोघांचा लग्नसोहळा इस्लामाबादमध्ये पार पडला.
-
Alhumdu’lillah by the grace of Allah SWT we have been blessed with a beautiful bundle of joy.
— Imad Wasim (@simadwasim) March 4, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Welcome to the world baby syeda inaya imad ❤️😘
">Alhumdu’lillah by the grace of Allah SWT we have been blessed with a beautiful bundle of joy.
— Imad Wasim (@simadwasim) March 4, 2021
Welcome to the world baby syeda inaya imad ❤️😘Alhumdu’lillah by the grace of Allah SWT we have been blessed with a beautiful bundle of joy.
— Imad Wasim (@simadwasim) March 4, 2021
Welcome to the world baby syeda inaya imad ❤️😘
त्यानंतर २६ ऑगस्ट २०१९ रोजी भव्य रिसेप्शन पार्टी देखील आयोजित केली होती. या पार्टीला माजी क्रिकेटपटू उपस्थित होते. शिवायस देशाचे पंतप्रधान इम्रान खान देखील हजर होते. इमादने पाकिस्तानकडून ५५ एकदिवसीय, ४९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामनेही खेळले आहेत. त्याने एकदिवसीय कारकीर्दीत ९८६ आणि टी-२० आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत ३०२ धावा केल्या आहेत. त्यांच्या खात्यात ४४ एकदिवसीय विकेट आणि ४७ टी-२० बळी आहेत.
हेही वाचा - VIDEO : धोनी आयपीएल २०२१ च्या तयारीला लागला, असे झाले जंगी स्वागत