ETV Bharat / sports

IND VS WI : अडखळणाऱ्या भारतीय संघाचा डाव अजिंक्य रहाणेने सांभाळला - भारत वि. वेस्ट इंडिज

भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवस अखेर भारताने 6 विकेट गमावून 203 धावा केल्या आहेत.

अजिंक्य रहाणे
author img

By

Published : Aug 23, 2019, 6:17 AM IST

Updated : Aug 23, 2019, 11:31 PM IST

एंटिगा - भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्याचा पहिल्या दिवसाचा खेळ संपला आहे. पहिल्या दिवस अखेर भारताने 6 विकेट गमावून 203 धावा केल्या आहेत. हा सामना एंटिगाच्या विवियन रिचर्ड्स क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात असून वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता.

फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. 25 धावांच्या आतच भारताने आघाडीचे फलंदाज गमावले. मयंक अग्रवाल 5 धावा तर चेतेश्वर पुजारा केवळ 2 धावा करत माघारी परतला. 7 धावांमध्ये दोन खेळाडू गमावल्यानंतर कर्णधार विराट कोहली फलंदाजीसाठी मैदानात आला. मात्र, त्यानेही निराशा केली. कोहली 9 धावा केल्यानंतर शैनन गेब्रियलच्या चेंडूवर बाद झाला.

भारताच्या या खराब सुरुवातीनंतर केएल राहुल आणि अजिंक्य रहाणे यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन करत भारताचा डाव सांभाळला. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 68 धावांची भागिदारी केली. त्यानंतर राहुल 97 चेंडूत 44 धावा करत रोस्टन चेसच्या चेंडूवर बाद झाला. त्यांनतर आलेला हनुमा विहारीने राहणेला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण तोही 32 धावा केल्यानंतर बाद झाला.

अजिंक्य राहणेने आपल्या कारकीर्दीतले 18 वे अर्थशतक बनवले. मात्र, त्याला शतक पूर्ण करता आहे नाही. 81 धावा करत तो शैनन गेब्रियलच्या चेंडूवर बोल्ड झाला. पावसामुळे दुसऱ्या सत्रातील डाव 15 मिनिटे अगोदरच संपवण्यात आला. पहिल्या दिवस अखेर ऋषभ पन्त (20*) आणि रविन्द्र जडेजा (3*) धावांवर खेळत होते.

Intro:Body:

sports

Conclusion:
Last Updated : Aug 23, 2019, 11:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.